


चंद्रपूर- ५ सप्टेंबर २०२३ ला शिक्षकदिनी भर पावसात सेवानिवृत्त शिक्षकांसाठी पुरोगामी शिक्षक संघटनेचे राज्यनेते विजय भोगेकर यांच्या नेतृत्वात जिल्हा परिषद चंद्रपूर समोर आंदोलन करण्यात आले होते . त्याची फलश्रुती सेवानिवृत्त शिक्षकांचे उपदान ,अंशराशीकरण व इतर लाभाची रक्कम जिल्हा परिषद चंद्रपूरला नुकतीच प्राप्त झाली आहे. ५ सप्टेंबर २०२३ च्या आंदोलनाची दखल घेत नुकतेच जिल्हा परिषदेला सेवानिवृत्त शिक्षकांसाठी 60 कोटी रुपये प्राप्त झाले असले तरी गटविमा ,सातव्या वेतन आयोगाची थकबाकी,मेडिकल बिल यासाठी अजून पैसा आलेला नाही त्यासाठी आंदोलनाचा दुसरा टप्पा करावाच लागेल ; असे मत राज्यनेते विजय भोगेकर यांनी व्यक्त केले असून त्यासाठी जिल्हाध्यक्ष किशोर आनंदवार , सरचिटणीस सुरेश गिलोरकर व जिल्हा कार्यकारिणी नियोजन करीत असल्याचे प्रसिद्धीप्रमुख लक्ष्मण खोब्रागडे यांनी कळविले आहे .













