Home यवतमाळ शहरातील नागरिकांच्या समस्या तात्काळ सोडवा!

शहरातील नागरिकांच्या समस्या तात्काळ सोडवा! [11 ऑक्टोबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज रयत संघर्ष समितीच्या वतीने महात्मा गांधी चौकात एक दिवसीय साखळी उपोषण]

164

 

✒️ सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ) मो.9823995466

उमरखेड (दि. 4 ऑक्टोंबर) छत्रपती शिवाजी महाराज रयत संघर्ष समिती या सामाजिक व राजकीय संघटनेच्या वतीने उमरखेड शहरातील नागरिकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी मुख्याधिकारी नगरपरिषद उपविभागीय अधिकारी उमरखेड उपविभागीय पोलीस अधिकारी उमरखेड तहसीलदार उमरखेड व ठाणेदार पोलीस स्टेशन उमरखेड यांना दिनांक 11 ऑक्टोबर 2023 रोजी महात्मा गांधी चौकात होणाऱ्या एक दिवशीय साखळी उपोषणा चे निवेदन देण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराजांचा मागील पावणे दोन वर्षापासून बंदिस्त असलेला अश्वारूढ पुतळा तात्काळ छत्रपती शिवाजी महाराज चौकात चार दुकाने पाडून त्या ठिकाणी उभारण्यात यावा, राजे छत्रपती संभाजी महाराज उद्यानातील गेटवर द्वारपालासारखा? उभारण्यात आलेला राजे संभाजी महाराजांचा पुतळा हटवून बगीच्या मधील इतर प्रशस्त जागी सन्मानाने उभारण्यात यावा, शहरातील घाणीचे साम्राज्य तात्काळ दूर करण्यात यावे, नाल्या सफाई व ओला सुका कचरा विल्हेवाट व्यवस्थित करीत नसलेल्या ठेकेदारावर कारवाई करावी.

तसेच शहरात दिवसेंदिवस डेंगू, मलेरियाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे दवाखान्यांमध्ये जास्त प्रमाणात लहान रुग्ण म्हणून आढळून येत असून
काही भरती होऊन दगावले सुद्धा आहेत.

याची गंभीर दखल घेऊन प्रत्येक वार्डात वारंवार औषध फवारणी करावी व डासांचे निर्मूलन करावे.. त्याचप्रमाणे उमरखेड नांदेड, उमरखेड ढाणकी, उमरखेड महागाव, उमरखेड पुसद रस्त्यावरील व वार्ड वार्डातील खड्डे तात्काळ बुजून रस्ते दुरुस्त करावे व शहरातील प्रत्येक रस्त्यावरील व वार्डा वार्डातील बंद असलेले स्ट्रीट लाईट तात्काळ सुरू करावे.

ह्या प्रमुख मागण्या मंजूर करण्याच्या दृष्टीने पंधरा दिवसात कामे सुरू करावी म्हणून 11 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी चौकात छत्रपती शिवाजी महाराज रयत संघर्ष समितीचे पदाधिकारी व सदस्य एक दिवशी साखळी उपोषण करणार असून पंधरा दिवसात कामे सुरू झाली नसल्यास पुढील तारखेची नोटीस देऊन महात्मा गांधी चौकात बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा नगर प्रशासन, जिल्हा प्रशासन तथा पोलीस प्रशासनास छत्रपती शिवाजी महाराज रयत संघर्ष समितीच्या पदाधिकारी व सदस्यांनी आज रोजी दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here