Home यवतमाळ ॲट्रॉसिटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी एस.डी.ओ. तथा एस.डी.पीओं.यांना निवेदन सादर..!! अनुसुचित...

ॲट्रॉसिटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी एस.डी.ओ. तथा एस.डी.पीओं.यांना निवेदन सादर..!! अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रकरणी तातडीने कार्यवाही करा,,जनतेची मागणी

162

बळवंत मनवर/पुसद
___________________________
पुसद/ अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याची प्रभावीपणे व काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याबाबत चे संबंधाने बिरसा ब्रिगेडच्या नेतृत्वामध्ये उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी यांची भेट घेतली यामध्ये अधिकाऱ्यांनी ॲट्रॉसिटी च्या घटनेबाबत गंभीरतेने दखल घेऊन कारवाई करण्यात येईल अशी ग्वाही दिली.
आदिवासी समाजाच्या रक्षणासह संपूर्ण मानव जातीवरील अन्याय अत्याचारासाठी पुढाकार घेणाऱ्या बिरसा ब्रिगेडच्या माध्यमातून भव्य महिला पुरुषांच्या सहभागाने अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. उपविभागीय पोलीस अधिकारी पुसद यांच्या कार्यक्षेत्रा मधील पोलीस स्टेशन मध्ये अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत नसल्याच्या अनेक तक्रारी संघटनेकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे एकंदरीत उपविभागीय पोलीस अधिकारी पुसद यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व पोलीस स्टेशनमध्ये अनुसूचित जाती आणि जमातीतील व्यक्तींनी मागील सहा महिन्यांतील दाखल केलेल्या संपूर्ण तक्रारींची एका समितीमार्फत चौकशी करून ॲट्रॉसिटी ची प्रभावी अंमलबजावणी करावी अशी मागणी रेटून धरली. सुप्रीम कोर्टाचे ॲट्रॉसिटी बाबत दखल गंभीरतेने घेण्याबाबत आदेश निर्देश असताना सुद्धा पुसद उपविभागात त्याची पायमल्ली होत असल्याने ॲट्रॉसिटीच्या प्रभावी अंमलबजावण्यासाठी उपाययोजना करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. यावेळी पोलीस स्टेशन पुसद ग्रामीण मधील बार्शी येथील ॲट्रॉसिटी प्रकरणात त्वरित गुन्हे दाखल करून आरोपींना अटक करण्याच्या मागणी सोबतच कवडीपूर येथील अल्पवयीन मुलीच्या छेडखाने प्रकरणात ॲट्रॉसिटीचा गुन्हा व इतर गुन्ह्याचा समावेश करण्यात यावा. तसेच निंबी येथील अल्पवयीन मुलीच्या सोबत लग्न साधण्याच्या उद्देशासाठी मुलीला धमकी देऊन तिच्या आईला धमक्या देऊन गुंडागर्दी करणाऱ्या आरोपीच्या मुस्क्या आवडल्या असल्या तरी त्यांच्या नातेवाईकामार्फत दबाव येत असल्याने फिर्यादी पक्षाला संरक्षण पुरविण्याची मागणी केली आहे यावर सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर पंकज अतुलकर यांनी तातडीने दखल घेऊन ॲट्रॉसिटी च्या घटनेसंबंधी तत्परतेने कारवाई करण्यात येईल अशी बिरसा ब्रिगेडचे अध्यक्ष मारोती भस्मे यांनी मांडलेल्या सत्य परिस्थितीवरील माहितीवरून दिली.
यावेळी बिरसा ब्रिगेडचे अध्यक्ष मारोती भस्मे यांच्या नेतृत्वातील या निवेदन देताना महिला बिरसा ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांसोबतच विद्यार्थी बिरसा ब्रिगेड व असंख्य महिला पुरुष मंडळी उपस्थित होते. तसेच अक्रोड संघटना व आदिवासी पॅंथर संघटनेसह विविध संघटनांनी चे पदाधिकाऱ्यांनी सुद्धा सहभाग नोंदविला होता.
……
*आदिवासीं अधिकाऱ्याला संडास साफ करण्यास लावणाऱ्या आरोपी खासदाराला अटक करा* बिरसा ब्रिगेड चेचे नेतृत्वात अनेक सामाजिक संघटनांचे राष्ट्रपतींना निवेदन. नांदेडच्या शासकीय हॉस्पिटलचे डीन यांना शौचालय साफ करण्यास लावणाऱ्या खासदार हेमंत पाटील यास ॲट्रॉसिटी अंतर्गत अटक करा आणि त्यांना खासदारकी पदावरून हटवून सहा वर्षासाठी निवडणूक लढण्यास बंदी घालण्याचे आदेश देण्यात यावे यासाठी बिरसा ब्रिगेडच्या नेतृत्वात राष्ट्रपती यांना उपविभागीय अधिकारी पुसद यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here