Home Breaking News बाबा बेकरी ते जुनी नगरपरिषद सिमेंट रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे होत असलेले काम...

बाबा बेकरी ते जुनी नगरपरिषद सिमेंट रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे होत असलेले काम तात्काळ बंद करा

139

 

 

अनिल साळवे, विशेष प्रतिनिधी मो. 86985 66515

गंगाखेड (प्रतिनिधी )
शहरात सध्या नगर परिषदेकडून विविध प्रभागांमध्ये सिमेंट रस्ते, नाल्याचे आदि विकास कामे होत आहेत पण काही प्रभागातील कामे हे निकृष्ट दर्जाचे व बोगस होत असल्याने नागरिकांमधून त्रिव नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.गुलजार कॉलनी,लक्ष्मी नगर येथील डॉ.झाकीर हुसेन उर्दू शाळा पुढील बाबा बेकरी ते जुनी नगरपरिषद पर्यंतचे सिमेंट रोडचे काम बोगस निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार येथील नागरिकांनी (दि.7 सप्टेंबर गुरुवार) रोजी नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की बाबा बेकरी ते जुनी नगरपरिषद पर्यंतचे सिमेंट रोडचे कामे अत्यंत बोगस व निकृष्ट दर्जाचे होत असून सदरील कामे ही अंदाज पत्रकानुसार होत नसून इस्टिमेट पेक्षा हलक्या प्रतीचे साहित्य वापरून शासनाची लूट केली जात आहे या रोडचे होत असलेले बोगस व निकृष्ट दर्जाचे कामाची चौकशी करून दोषीवर कार्यवाही करण्यात यावी व सदरील कामाचे बिल या अर्जाचा निकाल लागेपर्यंत काढण्यात येऊ नये व या रोडचे निकृष्ट दर्जाचे व बोगस काम तात्काळ बंद करण्यात यावे अन्यथा दिनांक 25 सप्टेंबर सोमवार रोजी नगरपरिषद कार्यालयासमोर आमरण उपोषनास बसण्याचा इशाराही देण्यात आला आहे या निवेदनावर सय्यद समीर बाबू, शेख समीर सैलानी, मजर खान खुर्शीद खान यांच्यासह गुलजार कॉलनी व लक्ष्मी नगर येथील सर्व नागरिकांच्या स्वाक्षरी आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here