


गुरु पौर्णिमेची
भेट दिली मी
धडा गिरवूनी
गुरु ला
गैर मी केले
सांगा काय असे ?
प्रश्न हा माझ्या
गुरू ला…
पोटी जन्मलो
नाही म्हणूनी
दोष माझा
कसा बरे ?
वय झाले मग
कधी निवृत्ती ?
माझी वेदना
सांगा बरे ?
अखेर पुतण्या
तुमचाच मी हो
भूतकाळ आठवीला
गुरू ला…
सावली होतो
आज परंतु
साथ सोडली
सावली ने
मग सांगा मन
प्रफुल्ल कसे हो ?
राहील वेडे
स्थिर हो
पटेल तुम्हाला
तसे वागलो
हाच ईशारा
गुरु ला…
वसंत…बहरला
आडविले पाणी
सुकली होती
पाने फुले
आतून मी जो
तसाच बाहेर
जीवन माझे
असे खुले
माझे भुज
बळ मीच वाहिले
आजवरी मी
गुरूला…
✒️कवी:-सुधाकर लोमटे(उमरखेड)













