


उपक्षम रामटेके (सहसंपादक) मो. 98909 40507
चंद्रपूर -पं.स.वरोरा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था र.न.११०, येथील सभासद रामचंद्र सालेकर यांनी संस्थेला लेखी स्वरुपात पत्र देवून त्यांनी आपल्या पतसंस्थेच्या उज्वल भविष्यासाठी,आपल्या पतसंस्थेच्या सभासदांना कसलीही आर्थिक अडचन येवू नये या उदात्त हेतूने पतसंस्थेद्वारा सभासदाच्या मयतीकरीता देण्यात येत असलेले वीस हजार रुपये, दरवर्षी देण्यात येत असलेली भेटवस्तु त्याचप्रमाणे सभासद मृत्यू नंतर देण्यात येणारी सहा लाखाची कर्जमाफी या सर्व सुविधा नाकारुन एका सामान्य सभासदाने सहकार क्षेत्रातील सर्व संचालक तथा सभासदांपुढे एक नवा आदर्श घालून दिला आहे. यापुर्वीही नुकत्याच झालेल्या पतसंस्थेच्या निवडणूकीत कसल्याही प्रकारचे भत्ते तथा एक पै सुध्दा न घेता पतसंस्थेची निस्वार्थ सेवा करण्याची त्यांनी त्यांच्या वचननाम्यात हमी दिली होती. मतदारांनी सुद्धा अपक्ष उमेदवार असतांनाही भरभरुन प्रतिसाद दिला परंतू थोड्याशा फरकाने संचालक पदावर पतसंस्थेत जाता आले नाही. तरीपण एक सभासद म्हणून सुद्धा आपली संस्था भरभराटीला यावी यासाठी ते नेहमी धडपडत असतात.संस्थेत होत असलेल्या गैरप्रकारावर विरोध धमक्यांना न जुमानता नेहमी वाचा फोडत असतात.
एक सामान्य सभासद आपल्या पतसंस्थेसाठी एवढा त्याग करु शकते तर संचालक पदावर असते तर नक्कीच पतसंस्थेच्या प्रगतीला योग्य दिशा मिळाली असती असे शिक्षक वर्गातून बोलल्या जात आहे.












