Home महाराष्ट्र भारतीय संविधानाला 132 बालकलाकारांनी दिली संगीतमय मानवंदना बालसाहित्य कलामंच व निर्मिती फिल्म...

भारतीय संविधानाला 132 बालकलाकारांनी दिली संगीतमय मानवंदना बालसाहित्य कलामंच व निर्मिती फिल्म क्लबचा उपक्रम

66

 

कोल्हापूर (प्रतिनिधी) महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांच्या जयंती निमित्त 132 बाल गायक-गायिका यांनी एकाच वेळी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सांघिक गायन करून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर निर्मित भारतीय संविधानाला मानवंदना दिली. राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर येथे सलाम संविधान हा कार्यक्रम पार पडला.
आदित्य म्हमाने, कनिष्का खोबरे, अमिरत्न मिणचेकर, स्वरा सामंत, तक्ष उराडे, स्वराज किरवेकर, स्वरल नामे, भूमी भस्मे, संस्कार येंडे, श्रीजा पाटील, ऋतुजा शिंदे, विघ्नेश शिंदे, हरिप्रिया खोत, प्रियाणी चिमगावकर, कोमल लांडगे, प्रांजल सुरवशी, प्रित्युश्री सुरवशी, इझयान मुरसल, विश्वजीत पाटील, वीरधवल पाटील, अतीफ काझी, नाज कुरणे, विहान वड्ड, पुष्कर कुसूरकर, प्रणव कुरणे, अनुष्का सुतार, अरिज कुरणे, भक्ती भस्मे, श्रावणी सांगलीकर, सक्षम मोहिते, शुभम सुतार याच्या सह महाराष्ट्रातुन 132 बालकलाकार सहभागी झाले होते.
यावेळी भारतीय संविधान वाचवण्यासाठी आम्ही लहान बालके प्रयत्न करू असे जाहीर अभिवचन या मुलांनी जनतेला दिले.
यावेळी अनिल म्हमाने, प्रा. किसनराव कुराडे, विजया कांबळे, डॉ. शोभा चाळके, छाया पाटील, ॲड. करुणा विमल, मधुकर शिर्के, संजयकुमार अर्दाळकर, किरण माधाळे, मिलिंद यादव, किशोर खोबरे, वर्षा सामंत, आरिफ काझी, डॉ. निकिता खोबरे, स्नेहल माळी, रुपेश कुसूरकर, शिवाजीराव भिसे, सुषमा शिंदे, रईसा मुरसल, आयेशा काझी, आशिया कुरणे, रियाज कुरणे यांच्यासह संविधान प्रेमी मोठया संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here