Home अमरावती सुषमा अंधारे यांच्या समर्थनार्थ बी.एस.एफ.ग्रुप ची निदर्शने

सुषमा अंधारे यांच्या समर्थनार्थ बी.एस.एफ.ग्रुप ची निदर्शने

156

✒️अमरावती(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

अमरावती(दि.19डिसेंबर):-जिल्ह्यातील प्रशांत नगर येथे बीएसएफ ग्रुप च्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रबोधनकार सुषमा ताई अंधारे यांच्या विरोधात सुरू असलेले काम,त्यांचा विरोध व त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो आहे काही राजकारणी त्यांना बदनाम करण्याचे षडयंत्र करत आहेत. त्याविरुद्ध सुषमा ताई अंधारे यांच्या समर्थनार्थ बी.एस.एफ.ग्रुप ने निदर्शने केली. चळवळीतील प्रामाणिक कार्यकर्त्यांना कोणीही फसवण्याचा प्रयत्न करत असेल तर ते आम्ही खपवून घेणार नाही.

तसेच सुषमा ताई अंधारे या कोणत्याही पक्षात गेल्या किवा असल्या तरी आम्ही त्यांना मतदान करू अशी प्रतिज्ञा करण्यात आली. यावेळी बी.एस.एफ.ग्रुप. ( ब्रेव सोशल फोर्स) संस्थापक अध्यक्ष महा.भूषण सरदार ( ब्रँड सरदार) यांनी तरुणांना मार्गदर्शन केले . तसेच येथे तरुणांना महापुरुषांची पुस्तके वाटण्यात आली. यावेळी प्रकाश अंभोरे, राजू कासदेकर,गुरुदेव इडपाचे, आकाश कासदेकर, रोशन डोंगरे, सय्याजी कदम, अविनाश आमटे , आदिनाथ गुरुकुले, सौरव शेलारे, राष्ट्रपाल घरडे, रॉयल सरदार इत्यादी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here