Home नागपूर राज्यस्तरीय प्रबोधनकार पुरस्काराने सतीश सोमकुवर सन्मानित

राज्यस्तरीय प्रबोधनकार पुरस्काराने सतीश सोमकुवर सन्मानित

109

✒️नागपूर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

नागपूर(दि.13जून):-प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस, दैनिक माझा मराठवाडा विदर्भ संपादक, ब्लू स्टॉर्म टिव्ही न्युज चॅनल संपादक, युवक आधार, जनता की आवाज चे पत्रकार संजीव भांबोरे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्या निमित्ताने सत्कार सोहळा कार्यक्रमाचे आयोजन सम्यक बुद्ध विहार, पहेला, ता.पवनी जि. भंडारा येथे करण्यात आले होते.*

             *प्रबोधनकार सतीश सोमकुवर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे, या संस्थेत नागपूर येथे समतादूत म्हणून कार्यरत आहे. तसेच संत गाडगेबाबा यांच्या वेशभूषेत समाज प्रबोधनातून शिव फुले शाहू आंबेडकर, संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत तुकाराम महाराज व थोर महापुरुष यांच्या विचारावर आधारीत आणि भारतीय संविधान, अंधश्रद्धा निर्मुलन, व्यसनमुक्ती, महिला सशक्तीकरण, पर्यावरण, आजचा युवा या विषयावर आपल्या प्रबोधन शैली द्वारे प्रबोधन कार्य अविरतपणे करीत असतात.

त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन जेष्ठ पत्रकार संजीव भांबोरे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्या निमित्ताने सत्कार सोहळा कार्यक्रम प्रसंगी खुशाल बोपचे माजी खासदार व राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय बहुजन महासंघ, दशरथ सुरडकर दैनिक माझा मराठवाडा व ज्ञानपंख न्युज चॅनल मुख्य संपादक, अश्विनकुमार वघाले फिल्म अभिनेते, चैताली भस्मे फिल्म अभिनेत्री, जेष्ठ पत्रकार संजीव भांबोरे यांच्या हस्ते सतीश सोमकुवर यांना राज्यस्तरीय प्रबोधनकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रबोधनकार सतीश सोमकुवर यांचे मित्र परिवारातर्फे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा प्रदान कऱण्यात येत आहे.*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here