Home महाराष्ट्र सेंदुरवाफा येथील मंजुषा चित्रीवेकर यांना समर्थ पुरस्कार प्रदान

सेंदुरवाफा येथील मंजुषा चित्रीवेकर यांना समर्थ पुरस्कार प्रदान

118

✒️किशोर बावणे(विशेष प्रतिनिधी)

समर्थ फाउंडेशन आणि वल्लरी मीडिया पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्वर मोगरा’ या बहुचर्चित म्युझिक अल्बमचा लोकार्पण सोहळा पुणे येथे आयोजित करण्यात आलेला होता. त्यांच्या साहित्य, कला आणि सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत समर्थ फाउंडेशन पुणे यांच्या वतीने सेंदूरवाफा ( साकोली ) येथील मंजुषा लोकेश चित्रीवेकर यांना समर्थ पुरस्कारने गौरविण्यात आले.

समर्थ फाउंडेशन आणि वल्लरी मीडिया पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्वर मोगरा’ या बहुचर्चित म्युझिक अल्बमचा लोकार्पण सोहळा रविवार, दि. १७ मे २०२६ रोजी पुणे येथे आयोजित करण्यात आला. या अल्बममध्ये सेंदूरवाफा ( सकोली ) येथील कवयित्री तथा गीतकार मंजुषा लोकेश चित्रिवेकर लिखित ‘बेधुंद पावसात फिरावे’ या गीताचा समावेश करण्यात आला होता. त्यांच्या साहित्यिक योगदानाची विशेष दखल यावेळी घेण्यात आली. ‘स्वर मोगरा’ या अल्बमचा लोकार्पण सोहळा खासदार डॉ. मेधाताई कुलकर्णी यांच्या शुभहस्ते तसेच डॉ. स्वाती महाळंक यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

अल्बममध्ये एकूण १३ गीतांचा समावेश असून विविध कवी-गीतकारांच्या रचनांना सुरेल संगीताची जोड देण्यात आली आहे. या अल्बमची संकल्पना आणि निर्मिती समर्थ फाउंडेशनची असून अध्यक्ष किरण इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम साकारण्यात आला. मंजुषा चित्रिवेकर यांच्या ‘बेधुंद पावसात फिरावे’ या गीताला रसिकांकडून विशेष पसंती मिळाली आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांचे ‘जिव्हाळा’ हे नाटक रसिकांच्या भेटीला आले. त्यामध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे.

सेंदुरवाफा ( साकोली ) या ग्रामीण भागातून पुढे येत त्यांनी साहित्य, कला, अभिनय आणि सांस्कृतिक क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. विविध स्पर्धा आणि उपक्रमांत उल्लेखनीय कामगिरी करत त्यांनी अनेक पुरस्कार प्राप्त केले आहेत. त्यांनी आपल्या तालुक्याचा आणि गावाचा नावलौकिक वाढवला आहे. साहित्य, संगीत आणि सांस्कृतिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेल्या मंजुषा चित्रिवेकर यांच्या यशाबद्दल विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here