


✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)
चिमूर(दि.16मे):-भारत देशातील ग्रामीण व शहरी भागात वैद्यकिय, आयुर्वेदिक शिक्षण न घेतलेले अनेक “झोलाछाप डाॅक्टर” अनेक वर्षापासून आपला वैद्यकिय व्यवसाय राजरोसपणे करीत असुनही त्यांच्यावर कोणतीच कारवाई होत नाही.
प्रत्येक शहर व मोठ्या गावाच्या ठिकाणी अनेक झोलाछाप डाॅक्टरांचा सुळसुळाट आहे. ह्या डाॅक्टरांची कुठेही नोंदणी नाही, त्यांना नोंदणी क्रमांक नसताना ते अनेक रूग्णांची विनापरवानगी तपासणी करतात. एवढेच नाही तर काहींनी डाॅक्टर असल्याचे फलक सुद्धा दवाखान्यावर लावले आहेत, परंतू त्यावर नोंदणी क्रमांक टाकलेला नाही.
वैद्यकिय व्यवसाय करणाऱ्या डाॅक्टर लोकांच्या काही संघटना आहेत. परंतू विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या झोलाछाप डाॅक्टरांची कुणी तक्रारही करीत नाही,हे सत्य आहे. यातील बरेच झोलाछाप डाॅक्टर पाईल्स, मुळव्याध यासारख्या आजाराच्या औषधी देतात व पेशण्टचे आॅपरेशन देखील करतात. विनापरवाना ह्या गोष्टी करणे पेशण्टला धोकादायक ठरू शकते. भारताच्या विविध भागात असे झोलाछाप डाॅक्टर आहेत. हजारो रूपये घेवून मुळव्याधसारख्या रोगाचे ते आॅपरेशन करतात. मुळ डाॅक्टरी व्यवसाय करणारे व नोंदणीकृत असलेल्या डाॅक्टरकडे लोक जात नाही कारण मुळव्याधसारख्या रोगाचा पेशण्टला खूप ञास होतो. असंख्य लोकांना हा ञास असतो.
या रोगाच्या शस्ञक्रियेचे तंञ व औषधी झोलाछाप डाॅक्टरांनी माहिती करून घेतलेल्या आहेत. काहीजण डाॅक्टरकडे कंपाऊंडर म्हणून काही वर्षे काम केलेले त्यांनी स्वतःच कोणतीही पदवी न घेता व नोंदणी क्रमांक नसताना आपला व्यवसाय सुरू केलेला आहे. अधिकृत व्यवसाय करणाऱ्या डाॅक्टरांची फी परवडत नसल्यामुळे लोक झोलाछाप डाॅक्टरांकडे जावून तपासणी करतात, ते एका कागदाच्या चिटोऱ्यावर आपली सही शिक्का न करता औषधी लिहून देतात. संबंधित शासकीय यंञणा आरोग्य विभाग हा व्यवसाय राजरोसपणे सुरू असताना कुठलीही कारवाई करित नाही.
कोरोना, चिकनगुणिया व अन्य साथीच्या रोगांच्या काळातही झोलाछाप डाॅक्टरांना अच्छे दिन होते. लाखो रूपये खर्च करून एम.बी.बी.एस, बी.ए.एम.एस., एम.डी.,एम.एस.पदवी प्राप्त केलेले नोंदणीकृत डाॅक्टरांपेक्षाही अनेक ठिकाणी झोलाछाप डाॅक्टरांची चांगलीच कमाई दिसून येते.















