


✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)
चिमूर(दि.25एप्रिल):-एप्रिल महिन्याची २५ तारीख गेली तर मार्च पेड इन एप्रिलचे वेतन अजुनही मिळाले नाही.त्यामुळे शिक्षकांची आर्थिक कोंडी झालेली आहे.
वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकाच्या अधिक्षक ठाकरे ह्या दि.२०/४/२०२६ पर्यंत रजेवर होत्या.त्या रूजू झाल्यानंतर त्यांनी वेतनबील जिल्हा कोषागाराकडे पाठविले आहे.परंतू त्यानंतर राज्य अधिकारी व कर्मचार्यांचा संप असल्यामुळे वेतनबीले कोषागारातच अडकून पडलेली आहे.
शिक्षकांच्या वेतनातून विमा,भविष्य निर्वाह निधी,पतसंस्था,गटविमा,आवर्त ठेव इ.विविध प्रकारच्या कपाती असतात.तसेच विविध बँकांचे कर्जाच्या कपातीही असतात.वेतन न झाल्यामुळे कर्जावरील व्याजाचा भुर्दंड दिवसेंदिवस वाढत आहे.दर महिण्याचे पगार एक तारखेलाच केले पाहिजे असे शासकीय परिपञक असताना वेतन विलंबाने होत आहे.यासंदर्भात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष विलास खोंड व कार्यवाह विठ्ठल राजुरकर यांनी मा.शिक्षणाधिकारी ( माध्यमिक) जिल्हा परिषद चंद्रपूर यांना निवेदनही सादर केले परंतू अजुनही मार्च २०२६ चे वेतन झाले नाही.
चंद्रपूर जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांचे वेतन वेळेवर एक तारखेलाच व्हावे यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या पदाधिकार्यांनी अनेकदा बैठका,चर्चा जिल्हा मध्यवर्ती बँक,जिल्हा कोषागार,वेतन पथक व शिक्षण विभाग यांचेशी चर्चा केलेली आहे,परंतू यात सुधारणा झालेली दिसून येत नाही.
शिक्षकांचे वेतन तात्काळ करावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे चंद्रपूर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख राजेंद्र मोहितकर यांनी केलेली आहे.














