


✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)मो:-8698566515
गंगाखेड(दि.10एप्रिल):-भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 14 एप्रिल जन्मोत्सव डॉ.बाबासाहेब आंबेडकर पूर्ण आकृती पुतळा परिसर सुशोभीकरणाची पाहणी करत असताना नगर परिषद गटनेते ॲड.मिथिलेश भैय्या केंद्रे,नगर परिषद कार्यालयीन अधीक्षक नागनाथ साळवे,नगर सेवक चंद्रकांत खंदारे,शेख साबेर,सुरेशभाऊ साळवे,सुरेश पारवे,आतीश खंदारे,इंजि.इंजि तांदळे, आगलावे,जगतकर,डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील पूर्णाकृती पुतळा, कंपाउंड भिंत, रंगरंगोटी,लाईट व्यवस्था,उपासकांना बसण्यासाठी मंडप व्यवस्था,पिण्याचे पाणी सर्व पाहणी करत अड.मिथिलेश केंद्रे यांनी पाहणी करत संबंधित अधिकारी/कर्मचारी यांना सुविधा पुरवण्या साठी चर्चा करत आदेश दिला त्याबरोबरच खूप दिवसापासून बंद असलेला डॉ.आंबेडकर चौकातील पोल वरील हायमास्क लाईट हा पण सुरू करण्यात यावा असे संबंधित इंजिनीयर आगलावेना सांगितले.














