Home चंद्रपूर राजुरा शहरातील हरितपट्टा नष्ट करण्याचा प्रयत्न

राजुरा शहरातील हरितपट्टा नष्ट करण्याचा प्रयत्न

66

▪️जाणीवपूर्व मोठमोठ्या वृक्षांना केले जाताय लक्ष

▪️नगर परिषद प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष; वृक्ष प्राधिकरण समितीच्या कार्यवाहीकडे सर्वांचे लागले लक्ष.

✒️सौ. सुवर्णा बादल बेले(विशेष प्रतिनिधी)मो:-8208158428

राजुरा(दि.२६मार्च):-सध्या राजुरा नगर परिषद क्षेत्रात सपशेलरित्या हरित पट्टा नष्ट करण्याचा खुलेआम प्रयत्न सुरू असून शेकडो वृक्षांना लक्ष करीत नगर परिषद वृक्ष प्राधिकरण समितीची कोणतीही लेखी परवानगी न घेता अवैधरित्या मोठ मोठ्या वृक्षांना तोडले जाताय, त्यांच्या मूळ ,खोडांवरवर अग्नी आणि विषारी रसायने वापरून मारले जात आहे याकडे नगर परिषद प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने पर्यावरणप्रेमीमधे तीव्र नाराजीचा सुर उमटत आहे. मागील पाच ते सहा महिन्यात शहरातील वृक्षांवर सर्रासपणे कुऱ्हाडी व कटिंग मशीनचा वापर करून अवैधरित्या वृक्षतोड केली जात आहे.

कर्नल चौक, जिल्हा परिषद शाळा, चुनाभट्टी वार्ड, रेल्वे क्रॉसिंग च्या बाजूला आसिफाबाद रोड, नवीन बस स्थानक परिसर आणि अन्य ठिकाणी मोठ्याप्रमाणात वृक्षतोड झाली आहे. परंतु नगर परिषद वृक्ष प्राधिकरण समिती आणि लोकप्रतिनिधी या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष करीत असल्याने पर्यावरणप्रेमी आणि सामान्य नागरिकही चिंता व्यक्त करत आहे. नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेने याबाबात वारंवार निवेदने, पत्रव्यवहार केला असून यावर तात्काळ उपाययोजना करून दोषींवर कायद्यानुसार योग्य ती कठोर व दंडात्मक कार्यवाही करावी अशी मागणी जोर धरत आहे. तसेच शहरातील जुन्या प्राचीन वृक्षांना हेरिटेज ट्री प्राचीन वृक्ष दर्जा देण्यात यावा, वृक्षांवर बॅनर पोस्टर लावणाऱ्यांवर कायदेशीर कार्यवाही करावी अशी सातत्याने मागणी होत आहे.

——————————————–

जिल्हा परिषद शाळेतील मोठे वृक्ष अवैधरित्या तोडले.

कर्नल चौकातील नगर परिषद च्या अधिकारक्षेत्रातील जागेवरील अनेक वृक्ष छाटले व तोडले याबाबत तर लेखी तक्रार करण्यात आली असून वृक्ष तोडणाऱ्या संबंधित व्यक्तींवर कुठलीही कार्यवाही झाली नसल्याने प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here