Home चंद्रपूर महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे विभागीय अधिवेशन परिवर्तनाची नांदी ठरावी!!

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे विभागीय अधिवेशन परिवर्तनाची नांदी ठरावी!!

108

दि.२८ व २९ मार्च २०२६ ला महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद या राज्यव्यापी रजिष्टर्ड संघटनेचे नागपूर विभागाचे दोन दिवशीय अधिवेशन चंद्रपूर येथील राजीव गांधी इंजिनिअरिंग काॅलेज बाबूपेठ येथे आयोजित केलेले आहे.

        शिक्षक परिषद संपूर्ण महाराष्ट्र राज्यात व्यापलेली संघटना आहे.पूर्वी ती विदर्भ माध्यमिक शिक्षक परिषद होती,आता संघटनेच्या घटनेत बदल करून ती महाराष्ट्रात राज्यव्यापी झालेली आहे.शिक्षक परिषदेचे ध्येय शिक्षकहित,शिक्षणहित, समाजहित व राष्ट्रहित हे आहे.

            अधिवेशनात शिक्षकांच्या ज्वलंत प्रश्नावर चर्चासञे आयोजित केलेली आहेत.यामध्ये जुनी पेन्शन,शिक्षक पाञता परीक्षा,राष्ट्रीय शॆक्षणिक धोरण,तक्रार निवारण इ.चा समावेश आहे.

     अधिवेशनाच्या निमित्ताने शिक्षक परिषदेच्या तालुका,जिल्हा,विभाग व राज्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील शाळा न शाळा पिंजून काढलेली आहे.प्राथमिक,माध्यमिक,कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालये,आश्रमशाळा,इंग्रजी माध्यमांच्या शाळा,तंञ निकेतन इ.शाळांना भेटी देवून निमंञण पञिका देण्याचे कार्य आज दि.२७/३/२०२६ पर्यंत पार पाडलेले आहे.

           संघटनेच्या विविध पदाधिकार्यांना भेटीनंतर विविध प्रश्न शिक्षक मंडळी शाळाशाळात विचारतात,त्यासाठीच अधिवेशाचे आयोजन केलेले आहे,अधिवेशनात या,सहभागी व्हा व आपले प्रश्न, समस्या,अडचणी लेखी स्वरूपात तीन प्रतीत घेवून या.तिथे विचारमंथन होईल अडचणीवर मार्ग निघेल,समस्यांचे समाधान होईल. 

           अधिवेशन हेच तर आपल्यासाठी एक व्यासपीठ,विचारपीठ आहे,विद्यापीठ आहे.या विचारयज्ञात सहभागी व्हावे.नाहीतर संघटनेच्या पदाधिकार्यांना शिक्षक अनेकदा फोन करतात राञंदिवस हे म्हणजे का? असे होत नाही का? तसे केल्याने काय होईल?

         जुनी पेन्शन शिक्षकांना लागू व्हावी म्हणून शिक्षक परिषदेने गटशिक्षणाधिकार्यांमार्फत अनेकदा राज्य सरकारकडे निवेदने पाठविली,आंदोलने केली,लढे दिलेत.यश आले नाही.

        अनेकदा शिक्षक परिषदेचे माजी शिक्षक आमदार नागो गाणार यांनी सभागृहात हा प्रश्न मांडला,शिक्षक पाञता परीक्षेबाबत योग्य मार्गाने लढा सुरू आहे.शिक्षकांच्या अनेक समस्या शासन दरबारी मांडलेल्या आहेत,काही प्रश्नात यश मिळालेले आहे,हे निमंञण पञिकेत छापलेले आहेत,याचेही चिंतन शिक्षकवर्गात झाले पाहिजे.संघटनेनी मिळविलेल्या यशाचीही,फलश्रृतीचीही चर्चा झाली पाहिजे.चंद्रपूर जिल्ह्यात अनेक शिक्षकांच्या समस्या सोडविण्यात शिक्षक परिषदेने यश मिळविले आहे.

                चंद्रपूर जिल्ह्यातील खाजगी माध्यमिक शिक्षकांचे मासिक वेतन कधीच वेळेवर मिळत नव्हते आता परिस्थिती बदललेली आहे,जिल्हा बँकेकडून विम्याचे संरक्षण कवच मिळाले,अनेक शिक्षकांची निवृत्तीवेतनाची प्रकरणे मार्गी लागली आहे.ते तात्काळ कसे मिळेल याची कार्यपद्धती तयार होणे गरजचे आहे.शिक्षकांना निवृत्तीवेतन वेळेवर मिळाले नाहीतर दंड व मिळणार्या रकमेवर व्याज आकारणे गरजेचे आहे.समस्या अनेक आहेत,त्यावर उपाययोजना ही निरंतर चालू राहते,नवनवीन समस्या निर्माण होतात,त्यावर उपाय शोधणे सुरू असते.

     चंद्रपूरला अधिवेशनाच्यानिमित्ताने नागपूर विभागातील शिक्षक एकञ येत आहेत .अधिवेशनात काही महत्त्वाचे ठराव होणार आहेत.ते ठराव महाराष्ट्र शासनाकडे पाठविले जाणार आहेत.

          सदर अधिवेशात शासन व प्रशासनाचे प्रतिनिधी,शिक्षकांचे प्रतिनिधी,जनतेचे प्रतिनिधी आहेत,हे विभागीय अधिवेशन शिक्षक— शिक्षणाच्या परिवर्तनाची नांदी ठरावी एवढीच अपेक्षा आहे.त्यासाठी जास्तीतजास्त शिक्षकांनी सहभागी व्हावे.

✒️राजेंद्र मोहितकर(प्रसिद्धी प्रमुख महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद चंद्रपूर जिल्हा( ग्रामीण)मो:-9422909525

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here