Home महाराष्ट्र आरमोरी नगरपरिषद अंतर्गत रो.ह.यो. ची कामे सुरू करा:भा. क .पा. ची मागणी

आरमोरी नगरपरिषद अंतर्गत रो.ह.यो. ची कामे सुरू करा:भा. क .पा. ची मागणी

83

✒️आरमोरी(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

आरमोरी(दि.17मार्च):- आरमोरी ग्रामपंचायतचे रुपांतर नगर पंचायत आणि नगरपंचायतचे रुपांतर नगरपरिषदे चा दर्जा प्राप्त होऊन आज जवळपास ७ ते ८ वर्षाचा कालावधी लोटला असुन अजून पर्यंत नगर परिषदेच्या वतीने कोणत्याही प्रकारचे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची कामे सुरू करण्यात आलेली नाहीत. नगरपरिषद हद्दीत बेरोजगार तरुणांनाची, नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात असून त्यांना रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे नगरपरिषद हद्दीत तात्काळ रोजगार हमी योजना सुरू करण्यात यावी. ज्यामुळे स्थानिक नागरिकांना रोजगार उपलब्ध होईल तसेच शहरातील विविध विकासकामांनाही गती मिळेल. करीता तात्काळ रोहयोची कामे सुरू करण्यात यावीत.असे आरमोरी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना भाकपाचे तालुका सचिव काॅ.प्रकाश खोब्रागडे, ऋषी रामटेके, प्रशांत खोब्रागडे, मिराबाई रंधये, सुरेश जुवारे, वामन रंधये, दिलीप चौके,नानाजी चौके, इत्यादींनी शिष्ट मंडळा व्दारे निवेदन दिले. 

    रोजगार हमी योजनेचे कामे तात्काळ सुरू न केल्यास भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने नगरपरिषद समोर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे.

आरमोरी शहराला नगरपरिषदेचा दर्जा प्राप्त होऊन आज जवळपास ७-८ वर्षाचा कालावधी लोटलेला आहे. नगरपरिषदे अंतर्गत मौजा रामाळा, पालोरा, अरसोडा इत्यादी गावे येतात. हे सर्व गाव व आरमोरी शहर मिळून आज घडीला चाळीस हजार पर्यंत लोकसंख्या होत आहे. नगरपरिषद क्षेत्रात कोणत्याही प्रकारचा उद्योगधंदा नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे.तसेच शेतकरी, शेतमजूर,व महिला इत्यादींच्या हातांना कामे नाहीत. नगरपरिषदे अंतर्गत येत असलेल्या मौजा रामाळा, पालोरा, अरसोडा या गावातील शेतकऱ्यांच्या शेतजमिनीतील शेतीची कामे संपली आहेत. त्यांच्या हातांना कामे नाहीत. अशा महागाईच्या परिस्थितीत मोठ्या कठीणाने सामना करिता आपला उदरनिर्वाह करीत आहेत.

आरमोरी नगरपरिषद हि ‘क ‘ श्रेणी दर्जा प्राप्त असून नियमाप्रमाणे आपले नगरपरिषद अंतर्गत आरमोरी सह रामाळा,पालोरा, अरसोडा या गावात रोजगार हमी योजनेची कामे त्वरित सुरू करण्यात यावीत. तरी नगरपरिषद प्रशासनाने या बाबत लवकरात लवकर सकात्मक निर्णय घेवून आरमोरी नगरपरिषद अंतर्गत रोजगार हमी योजनेची कामे सुरू करावी. अन्यथा नगरपरिषदे समोर भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here