


✒️जगदीश का.काशिकर(विशेष प्रतिनिधी)मो:-९७६८४२५७५७
शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ उगाच म्हणत नाहीत. इस्त्रायल – अमेरीकेने ईराण बाबत जे काही इनपुट्स ए आय ला फिड केलेले होते त्यावरुन आखलेल्या योजना तेवढ्या काही यशस्वी होतांना दिसत नाहीयेत. सहाजीक आहे ए आय बनवणारा शेवटी माणूसच आहे.
ईराणमध्ये खोमनेई आणि कंपनी संपवली की ईराण तुटेल, शरण येईल, मग आपल्याला हवं ते पपेट सरकार आपण तिथे स्थापू, ईराणचं तेल काबीज करु वगैरे प्लॅनिंग मुळीच साध्य होतांना दिसत नाहीये. नो डाऊट इराणची ठुकाई महाप्रचंड झालीये ८००० पेक्षा जास्त एरियल अॅटॅक्स झालेत, इंफ्रास्ट्रक्चरची भयंकर हानी झाली तेहरान बेचिराख व्हायच्या मार्गावर आहे पण हाती काय लागलं ? असं विचारलं तर ट्रंप – नेतन्याहूंकडे आम्ही ईराणची कंबर मोडली, नेतृत्वाच्या तीन फळ्या संपवल्या या पलिकडे सांगायला काही नाही.
युद्ध महाप्रचंड खर्चिक असतं. आणि यात ईराण अमेरीका-इस्त्रायलला थकवतोय असं दिसतंय पैशानी नव्हे पण खर्च करायला लावून.
खोमनेई सत्ताकाळात ईराणवर प्रचंड सॅंक्शन्स लादली गेली अगदी खाण्यापिण्याच्या काही परदेशी गोष्टींबाबतही. प्लस ईराणला त्यांचं क्रुड विकायला बंदी. ईराण ला इलेक्ट्रॉनिक पार्ट्स द्यायला बंदी, नवीन तंत्रज्ञान तर सोडाच पण जुनी मशिनरी रिपेअर करायलाही पार्ट्स देण्याला बंदी आहे. या कालावधीत ईराण ने चीन आणि रशिया यांच्या मदतीने क्षेपणात्रं विकास याला प्रथम प्राधान्य दिलं. एकदा अमेरीकन ड्रोन इराणमध्ये पडल्यानंतर ईराण्यांनी व्यवस्थीत रिव्हर्स इंजीनीयरींग करत आत्मघाती ड्रोन्स डेव्हलप केले.
ईराणकडे सुसज्ज एअर डिफेन्स सिस्टीम नाही, हवाईदल नाही, पण मिसाईल्स मोठ्या प्रमाणात अजूनही शिल्लक असावीत असा अनेकांचा अंदाज आहे. तरीही मिसाईल हा प्रकार खर्चीकच. इथे बाजी मारतोय तो ईराणी ड्रोन.
चक्क प्लॅस्टीक, लाकूड आणि ७० ते ९० सीसीचं टु स्ट्रोक पेट्रोल इंजीनवर चालणार्या इराणी ड्रोन मध्ये २५ ते ५० किलो हायली एक्स्प्लोझीव्स असतात. हा ड्रोन दोन ते अडीच हजार किलोमिटर जाऊ शकतो एवढं पेट्रोल भरायची व्यवस्था असते आणि हा ड्रोन सुमारे दिडशे किलोमिटर प्रतितास या वेगात उडतो. अगदी कमी वेग, लहान आकार आणि कमी उंचीवरुन ऊडायची क्षमता यामूळे हा राडार्स ला लवकर सेन्सच होत नाही, लहान आकार आणि कमी वेगामुळे हा ड्रोन आहे की एखादा पक्षी आहे हे हवाई सुरक्षा यंत्रणेला धड समजतच नाही. बिलीव्ह मी हा ड्रोन तर काही लाखात बनतो आणि बरेच लाख त्याला जीपीएस गाईडन्स, नेवीगेशन या यंत्रणा बसवायला लागतात.
असंही म्हटलं जातं की इराणकडे असे आत्मघाती ड्रोन लाखाच्या घरात आहेत. ईराण महीन्याला हे ८००० ते १०००० ड्रोन्स बनवू शकतोय. ( तज्ञांचे अंदाज आहेत माझे नाही ) विचार करा इराण रोज १००० ड्रोन्स पाठवायला लागला तरी अमेरीका इस्त्रायलच्या तोंडाला फेस येईल. काही लाखाच्या ड्रोन ला इंटरसेप्ट करायला ट्रंप – नेतन्याहू या जोडगोळीला कोट्यावधी रुपयांची इंटरसेप्टर मिसाईल्स वापरायला लागतायंत.
ईराण हे युद्ध जिंकेल असं मी म्हणतही नाही किंवा समजतही नाहीच. पण महासत्तेचे इंटेल्स आणि रेकी किती चुकीची ठरतेय यावर मी विचार करतोय. इराणचा एवढा संहार झालाय पण जनता लगेच आय आर जी सी विरोधात रस्त्यावर आली का ? कदाचित अमेरीकेला वाटलं त्या प्रमाणात ती येणारही नाही, कारण मी मागेही बोललेलो की ईराण्यांची टॉलरेट करायची क्षमता आफाट आहे. ( याउलट भारतात बघा, गॅस टंचाई होऊ शकणार आहे म्हणून आधीच आकांडतांडाव सुरु झालेलं आहे.)
भारताने यातून शिकावं. भारतावर कसलीही बंधनं नाहीयेत. भारत ऑटो इंडस्ट्रीत दिग्गज आहे. खासगी क्षेत्राला सहभागी करुन अशाच स्वस्त आत्मघाती ड्रोंन्स चा महाप्रचंड साठा भारताकडे असायला हवा. तरच एकाच वेळी पाकीस्तान, नेपाळ, चीन, बांगलादेश या चार फ्रंटवर भारताला तुलनेने कमी खर्चात गड लढवता येईल. समजा नेपाळ बॉर्डरवरुन घुसखोरी धोकेदायक प्रमाणात सुरु झाली तर ब्रम्होस वापरणार का ? त्यापेक्षा चार पाचशे ड्रोन परवडतील की नाही ?
आखाती युद्ध लवकर संपेल असं वाटत नाही. ईस्त्रायल, अमेरीका इराणच्या ड्रोन्सच्या संख्येला पुरुन उरतील एवढी इंटरसेप्टींग मिसाईल्स बनवू शकतील ??? अवघड दिसतं. महासत्तेला डावपेच बदलावेच लागतील.
युक्रेन युद्धाने आत्मनिर्भरता किती गरजेची आहे हे शिकवलं आणि खाडी युद्धाने ड्रोननिर्भरता असलीच पाहीजे हे शिकवलं असं म्हटलं तर अवास्त्व होणार नाही.
तळटीप : पोस्ट वादासाठी नाही. पोस्ट कुणाला आवडावी यासाठी नाही. पोस्ट मध्ये वस्तुस्थीती काय आहे यावरुन मला सुचलेले विचार आहेत. हो नाहीतर मला इराणवादी ठरवून लगेच ढाल तलवार घेऊन धावून येतील. माझा कल नेहमीच इस्त्रायलकडे असतो, आणि भारताचा काय फायदा ? याकडे असतो.














