Home महाराष्ट्र धरणगाव महाविद्यालयात फिजिक्स टॅलेंट सर्च परीक्षेचे आयोजन 

धरणगाव महाविद्यालयात फिजिक्स टॅलेंट सर्च परीक्षेचे आयोजन 

214

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी डी पाटील सर)

 धरणगांव(दि.12मार्च):- कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय धरणगाव येथे भौतिकशास्त्र विभागातर्फे फिजिक्स टॅलेंट सर्च परीक्षेच्या आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत प्रथम क्रमांक कु. लीना भरत पाटील व द्वितीय क्रमांक कु. रितिका सुजित वाघरे यांचा आला होता.

विजेत्या विद्यार्थिनींना उपप्राचार्य डॉ. विजयानंद वारडे आणि सिनेट मेंबर क. ब. चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव डॉ. कांचन महाजन यांच्या हस्ते पुस्तक, पेन आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी भौतिकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. अभिजीत जोशी, प्रा.राजू केंद्रे, डॉ. गौरव महाजन, डॉ. हर्षवर्धन भालेराव ,प्रा. प्रशांत क्षत्रिय, श्री. किरण सुतारे हे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here