


▪️प्रख्यात कवी प्रवीण कांबळे (शब्दास्त्र प्रमुख), विद्रोही अविनाश गोंडाणे, प्रा.देवानंद पाटील, दिलीप शापामोहन, हर्षवर्धन तायडे, अरुण बुंदेले यांची उपस्थिती
✒️अमरावती(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
अमरावती(दि.5मार्च):-बी.आर. ए.नवयुवक मंडळ,रमाई महिला मंडळ,बोधिवृक्ष महिला मंडळ खरडगाव आणि समता सैनिक दल यांच्या संयुक्त विद्यमाने, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या उपस्थितीत २१,२२मार्च १९२० ला,माणगाव(कोल्हापूर) येथे ऐतिहासिक परिषद पार पडली होती.या ऐतिहासिक परिषद दिनाचे औचित्य साधून, खरडगाव(खळना) येथे,२१,२२मार्च रोजी दोन दिवसीय धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. २१मार्च रोजी, प्रवीण कांबळे (शब्दास्त्र प्रमुख),विद्रोही अविनाश गोंडाणे,प्रा.देवानंद पाटील,दिलीप शापामोहन,हर्षवर्धन तायडे,अरुण बुंदेले या प्रख्यात कवींच्या उपस्थितीत,परिवर्तनवादी कवी संमेलन पार पडणार आहे.
धम्म परिषदेत पार पडणाऱ्या कवी संमेलनात सहभागी कवी म्हणून श्री .न.डोंगरे,विशाल मोहोड,सुनीता मेश्राम,रमेश राऊत,पद्मा घरडे,अविनाश रोकडे, प्रनोती शेंडे,रिजवान शेख,सुशांत मेश्राम, ठवरे गुरुजी हे नामवंत कवी सहभागी होणार आहेत तर कवी संमेलनाचे अध्यक्षस्थान,भूमिपुत्रांचे स्वातंत्र्य या गाजलेल्या कविता संग्रहाचे कवी प्रा.पद्माकर मांडवधरे हे भूषविणार आहेत तर कवी संमेलनाचे संचालन स्नेहल सोनटक्के या करतील. वैचारिक परिवर्तनवादी कवी संमेलनास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवहान आयोजकांनी केले आहे .














