


✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)
पुसद(दि.4मार्च):-पंचायत समिती पुसद अंतर्गत येत असलेल्या मांडवा ग्रामपंचायत येथे दि. १७ सप्टेंबर २०२५ते ३१मार्च २०२६ पर्यंत सुरु असलेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानातर्गत विविध स्तुत्य उपक्रम राबविल्या जात आहेत. त्याचाच भाग म्हणून गावातील विविध मुख्य चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले.
१५ वित्त आयोगातून ग्रामपंचायतीने जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा तथा कै. सुधाकरराव नाईक चौकाकडे जाणारा मार्ग,डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा, अंगणवाडी क्रमांक २, लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे चौक, महानायक वसंतराव नाईक चौक कै. सुधाकरराव नाईक चौक,अशा विविध ठिकाणी तथा गावातील अनुचित प्रकारांना आळा बसावा या हेतूने ग्रामपंचायतीने गावातील विविध मुख्य चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्याबदल गावातील नागरिकाकडून या निर्णयाचे स्वागत केल्या जात आहे.तसेच लोकसहभाग, ग्रामपंचायत, ग्रामसेवक एस.टी.तडसे हे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या स्पर्धेत क्रमवारीत कसा येईल यासाठी विविध उपक्रम राबविण्यासाठी अथक परिश्रम घेत आहेत.














