Home चंद्रपूर महाराष्ट्र राज्यात खरचं मराठी भाषेचा सन्मान होत आहे का? 

महाराष्ट्र राज्यात खरचं मराठी भाषेचा सन्मान होत आहे का? 

58

महाराष्ट्र राज्यात मराठी शाळांना उतरती कळा लागलेली आहे.जिल्हा परिषद व खाजगी माध्यमिक शाळेत विद्यार्थी पटसंख्यमुळे शिक्षक अतिरिक्त ठरत आहेत.

       येत्या पाच वर्षात अनेक मराठी शाळा बंद होईल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे.याऊलट दरवर्षी नवनवीन इंग्रजी शाळा निघत आहे.इंग्रजी शाळा उघडण्यासाठी काही नियम,निकष,अटी,आकृतीबंध असावेत की नाहीत? एकाच गावात,शहरात किती इंग्रजी शाळा द्याव्यात याला काही मर्यादा ठेवता येईल काय? 

       मराठी शाळांची दयनीय अवस्था होण्यासाठी मराठी भाषेवर प्रेम करणारे सर्व जबाबदार नाही का?मराठी शाळा ज्या व्यवस्थापक मंडळाने निर्माण केली त्यातील बहुतांश सदस्यांचा एकही पाल्य या शाळेत शिकत नाही.पूर्वी या शाळेतून शिकलेले अनेक विद्यार्थी जे काही आता नोकरीत, व्यवसायात आहे त्यातील बहुतेकांची मुले मराठी शाळेत शिकत नाहीत.मराठी शाळेत नोकरी करणारे प्राध्यापक,शिक्षक,कर्मचारी यांचेही पाल्य बहुतेकांची त्यांच्या शाळेत शिकत नाही.मग या शाळेत विद्यार्थी कुठून येणार? 

              मराठी भाषेवर प्रेम आहे .परंतू त्या भाषेच्या संवर्धनासाठी,त्या भाषेचे जे उगमस्थान आहे त्या प्राथमिक व माध्यमिक शाळाच जर भविष्यात हद्दपार झाल्या तर मराठी भाषेचा खरचं महाराष्ट्र या मराठी भाषिक राज्यात सन्मान होईल का? हा यक्ष प्रश्न आहे.मराठी शाळा टिकविण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या पदाधिकार्यांनी,आमदारांनी शासनाकडे अनेकदा उपाययोजना सुचविल्या विधीमंडळात प्रश्न मांडले.परंतू याकडे दुर्लक्ष करण्यात आलेले आहे.मराठी शाळा टिकविण्यासाठी शासनाने दीर्घकालीन उपाययोजना केली पाहीजे अशी विनंती शासनाला आजच्या मराठी भाषा गॊरव दिनाच्या निमित्ताने कराविशी वाटते.

✒️राजेंद्र मोहितकर(प्रसिद्धी प्रमुख महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद चंद्रपूर जिल्हा(ग्रामीण)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here