


✒️रोशन मदनकर(उप संपादक)
ब्रम्हपुरी(दि.26फेब्रुवारी):- चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूरचे माजी आमदार अविनाश वारजुकर आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश वारजुकर यांनी काँग्रेस पक्ष सोडत भाजपचा कमळ स्वीकारला आहे. चिमूर येथील काँग्रेसचे माजी आमदार अविनाश वारजुकर आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सतीश वारजुकर या बंधूनी काँग्रेसला काडीमोड दिली आहे. मुंबईत भाजपमध्ये प्रवेश करणार असे सूत्राकडून माहिती प्राप्त झाली आहे.
चिमूरमधून मागील दोन्ही विधानसभा निवडणुकीत वारजुकर बंधूना सहसा विजय मिळविता आला नाही. त्यामुळे ते भाजपात पक्ष प्रवेश करत असल्याचे सूत्राकडून माहिती प्राप्त झाली आहे. वारजुरकर बंधूनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत कमळाच्या मार्ग स्वीकारला आहे. मुंबईच्या भाजप पक्ष कार्यालयात भाजपमध्ये प्रवेश घेणाचे वारजुकर बंधू यांचे ठरले. या अचानक घडामोडीमुळे चिमूर व ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघात तसेच येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसला मोठा फटका बसणार असे वर्तविले जात आहे. मात्र जनता अशा प्रतिनिधीचे नखरे खपवून घेणार काय हेही तितकेच तर्कशील समजले जात आहे.














