Home महाराष्ट्र गुलामी आणि विद्रोह

गुलामी आणि विद्रोह

133

मुळात म्हणजे निसर्गतः माणूस हा गुलाम नाही, कारण ज्याला मन आणि बुद्धी आहे आणि ती विकसित होत जाते असा माणूस गुलाम होणे शक्य नाही, तरी ते शक्य केल्या जाते. पाण्याच्या प्रवाहाप्रमाणे माणसाची विचार हे प्रवाही असतात परंतु पाण्याला बांध घालून अडविले जाते तसे विचाराला सुद्धा बांधण्यात येतो म्हणजेच विचार आडविले जातात, तेव्हा माणूस गुलाम बनतो. कारण विचार करण्याची त्याची शक्ती कुठल्या जाते, थांबला जाते. विचार आडविण्याचे काम विषमतावादी शक्ती करत असतात. 

    माणसाला जसे विचार आहेत तसेच भावना पण आहेत. आणि माणसा विचारशील पेक्षा भावनाशील अधिक असतो, याचा फायदा विषमतावादी लोक घेत असतात. भावनेतून श्रद्धा, श्रद्धेतून अंधश्रद्धा, अंधश्रद्धेतून गुलामी, असा हा गुलामीचा प्रवास सुरू होतो. 

     माणसात आत्मविश्वास हिम्मत कुशलता म्हणजे तरकीब, नवनिर्मितीची कला हे नैसर्गिक गुण असले तरी याबरोबरच माणूस हा भित्रा पण आहे, या भीतीपोटी तो आपला आत्मविश्वास गमावतो, आणि नवनिर्मिती ला मुकतो. सगळ्यात आधी माणसाला त्याचा जीव प्यारा असतो, तुझी वाचण्यासाठी आणि स्वतः जिवंत राहण्यासाठी तसेच आपले कुटुंब जिवंत राहण्यासाठी तो आपल्या जीवनात अनेक प्रकारच्या हार स्वीकारत असतो म्हणजे पराभव स्वीकारत असतो, त्यामुळेच तो गुलाम बनतो. जीवन हा एक संघर्ष आहे, जेवण म्हणजे लढाईचे एक मैदान आहे, या मैदानात तो लढत असतो परंतु जिवंत राहण्यासाठी माघार घेतो म्हणून तो गुलाम होतो. आणि तो जर माघार घेत नसेल तर त्यास कसे गुलाम करायचे त्याचे षडयंत्र विषमतावादी लोक करीत असतात. त्यांना माहित असते की माणूस हा विचारापेक्षा भावनेने प्रभावित असतो, या त्याच्या भावनेचा गैरफायदा कसा घ्यायचा ? हे विषमतावादी लोकांना किंवा स्वार्थी लोभी कपटी दुष्ट लोकांना वर्चस्ववादी लोकांना पक्के माहीत असते, म्हणून त्यात स्वतःचा जीव वाचण्यासाठी किंवा कुटुंब पोहोचण्यासाठी किंवा सुखात किंवा आयशारामात जीवन जगण्याच्या लोभापोटी विचारवंत सुद्धा लाचारी पत्करतात आणि गुलाम बनतात. आणि जे विचारवंत नाहीत ते श्रद्धेला बळी पडतात. श्रद्धा ही दोन प्रकारची असते, एक डोळसृदा आणि दुसरी अंधश्रद्धा. सर्वसामान्य माणसे विवेकाचा वापर करीत नाहीत म्हणून ते अंधश्रद्धेला बळी पडतात. आणि गुलाम बनतात. 

   विषमतावादी वर्चस्ववादी लोकांनी षडयंत्र केले. असत्य आणि अवैज्ञानिक अशा काही संकल्पना निर्माण केल्या. त्या सामान्य लोकांना सांगून पटविल्या. त्या संकल्पनांची पोत्याग्रंथ कथा कविता कीर्तने पोवाडे निर्माण केले, शालेय अभ्यासक्रमा निर्माण केला आणि बालवयापासूनच लोकांमध्ये देव आणि धर्म या दोन गोष्टी आणि त्यातील अंधश्रद्धा रुजविल्या. दगडालाच देव म्हणायचे, त्यास हळद-कुंकू फुले वाहून पूजा करायची, त्या शेंदूर लावून पुष्पमाला टाकायच्या, त्यावर देवळे उभी करायची, आणि आपण तिथे पुजारी म्हणून पुरोहित म्हणून अधिकार गाजवायचा, आणि लोक दानपेटीत जे पैसे सोने नाणे जड जेव्हाहीर टाकतील त्याचा उपभोग घ्यायचा, हा पुरोहित धंदा काही लोकांनी सुरू केला. तसेच भांडवलदार आणि जमीनदारांनी कष्टकरी जनतेस देव दैव आणि धर्म पुढे करून तुमच्या पूर्वजन्मीचे पाप म्हणून तुम्हाला तुमच्या जातीत जन्म घ्यावा लागला आणि कष्टाची कामे करावी लागत आहेत हे पटविले, त्यांचे वारे माप शोषण केले, शासनात बसून हवा ढवळे कर लावून तिजोरीत पैसा जमा केला, कारखाने काढून भरमसाठ नफा कमविला आणि गरीब श्रीमंत मध्यम असा वर्गावर आधारित आर्थिक विषमता निर्माण केली. 

    आर्थिक विषमता आणि सामाजिक विषमता निर्माण करून या विषमतावादी व्यवस्थेचे मालक बनले ते म्हणजे प्रस्तापित लोक होत. अशाप्रकारे प्रस्थापित आणि विस्थापित अशी समाज रचना निर्माण झाली. मालक आणि नोकर, मालक आणि गुलाम अशी व्यवस्था निर्माण झाली. शोषण आणि शासन हा या विषमतावादी व्यवस्थेचा मूळ पाया आहे. यामुळेच गुलामी ची व्यवस्था निर्माण झाली. 

       या विषमतावादी व्यवस्थेत गरीब हा मध्यमवर्गीयाचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करतो आणि मध्यमवर्ग हा श्रीमंत वर्गाचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करतो तसेच श्रीमंत वर्ग हा भांडवलदार वर्गाचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करतो ही एक शर्यत आहे, स्पर्धा आहे, स्पर्धेची संस्कृती ही स्पर्धात्मक खेळातून निर्माण केल्या जाते. ज्यात चळवळ असते, हरणे जिंकणे असते, एकमेकांचे पाय ओढणे असते, पुढच्याला मागे टाकून पुढे जायचे असते, असे हे खेळ या विषमतावादी व्यवस्थेत लहान आणि तरुण मुलांवर संस्कार म्हणून केले जातात. 

        आर्थिक विषमतेच्या या व्यवस्थेत खालचा वर्ग वरच्या वर्गाचे अनुकरण करीत असतो पण वरचा वर्ग हा खालच्या वर्गाचे अनुकरण करत नाही, या व्यवस्थेत वरचा वर्ग हा खालच्या वर्गाचे शोषण करीत असतो, आर्थिक आणि सामाजिक शोषण चालू असते. आर्थिक शोषण हे कष्टकऱ्यांच्या श्रमाची चोरी करणे, ग्राहकांच्या खिशातील पैसा काढून भरमसाठ नफा कमावणे, साठेबाजी काळाबाजार आणि अवैध धंदे करून श्रीमंत होतात, भांडवलदार बनतात आणि गरीब मध्यम श्रीमंत असे वर्ग कायम ठेवतात आणि यातील दरी वाढविण्याचे काम करतात हे विषमतावादी विचाराचे लोक. 

    सामाजिक विषमता ही सर्वसामान्य भोळ्या भाबड्या लोकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेऊन त्यांना देवाच्या धर्माच्या कर्मकांडाच्या आणि अंधश्रद्धांच्या नादी लावून, त्यांचे आर्थिक शोषण करतात, तसेच जातीयत्तेची उतरंड करून, रोटीबंदी बेटी बंदीचा कायदा करून तसेच धर्मांधता आणि धार्मिक तेढ वाढवून सामाजिक विषमता कायम ठेवण्याचा प्रयत्न करतात. 

    जोपर्यंत आर्थिक विषमता म्हणजे वर्ग तसेच सामाजिक विषमता म्हणजे जाती आणि धर्मांधता या तीन गोष्टी जनतेच्या समाजाच्या डोक्यातून जाणार नाहीत तोपर्यंत ही गुलामी व्यवस्था नष्ट होणार नाही. 

     हे विषमतावादी गुलामी व्यवस्था नष्ट करायची असेल तर समतेचे विचार म्हणजेच मानवतेचे विचार, विज्ञाननिष्ठ विचार, सकल जन हितकारी विचार, म्हणजेच संत महात्मे महामानव क्रांतिकारी लोकांचे विचार जोपर्यंत सामान्य जनता स्वीकारणार नाही, किंवा त्यांच्या विचाराचा प्रचार प्रसार होणार नाही, लोकांची जाणीव जागृती होणार नाही, तोपर्यंत ही विषमतावादी गुलामीची व्यवस्था नष्ट होणार नाही, यासाठी महामानवांचे विचार, समतेचे विचार रुजवून त्या विषमतावादी प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात विस्थापित जनतेने म्हणजेच बहुजनांनी विद्रोह केल्याशिवाय पर्याय नाही, विद्रोहाचाच एक प्रयत्न म्हणजेच 20 वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन नांदेड हे होय. 

   गुलामी म्हणजे काय, सोशल म्हणजे काय, श्रद्धा आणि अंधश्रद्धा म्हणजे काय, स्वातंत्र्य समता बंधुभाव आणि न्याय याचा अर्थ काय, या सर्व गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर गुलाम असलेला बहुजन समाज यांनी या विद्रोही साहित्य संमेलना चा लाभ घ्यावा. म्हणजे आपण गुलाम कसे आहोत ? याची जाणीव होईल. विद्रोही साहित्य म्हणजे काय ? कळेल. आपण प्रस्थापितांचे कसे गुलाम आहोत ? त्याची पण जाणीव होईल. गुलामाला गुलामीची जाणीव करून दिल्याशिवाय तो बंड करून उठणार नाही, म्हणून आपण बहुजन लोक कसे गुलाम आहोत याची जाणीव करून घेऊया, आणि विद्रोह करण्यास सज्ज होऊया. 

✒️लेखक:-दत्ता तुमवाड(सत्यशोधक समाज नांदेड)मो:-9420912209

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here