Home महाराष्ट्र गंगाखेड शहरात चोरट्यांचा धुमाकूळ एकच रात्री चार दुकाने फोडली

गंगाखेड शहरात चोरट्यांचा धुमाकूळ एकच रात्री चार दुकाने फोडली

420

✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)मो:-8698566515

गंगाखेड(दि.11फेब्रुवारी):- शहरातील मुख्य बाजारपेठेतील नवा मोंढा परिसरात बुधवारच्या पहाटे चोरट्याने धुमाकूळ धुमाकूळ घालीत चार दुकानाचे शटर वाकून लगदी रोकड व काही साहित्य लंपास केले याप्रकरणी गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया चालू आहे 

नवा मोंढा येथील ज्ञानेश्वर शिंदे यांचे माऊली ट्रेडर्स, अनिल भुसारे यांचे भविष्य कृषी केंद्र, श्रीनेश किराणा दुकान व अन्य एक दुकानदार असा चार दुकानाचा समावेश आहे माऊली ट्रेडर्सच्या मालक हे तालुका सीड्स फर्टीलायझर असोसिएशनचे अध्यक्ष आहेत त्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या दुकानातील पाच ते सात हजाराचे रोकड गल्ल्यातून काढून घेण्याची माहिती दिली तसेच अनिल भुसारे यांनी आपल्या गल्ल्यातून पाच ते सहाशे रुपये गेल्याची माहिती दिली तर श्री श्री गणेश किराणा चे मालक रवी कवठकवार यांनी दुकानात ठेवलेले पावणेदोन ते दोन लाख रुपयांचे रोख रक्कम चोरी गेल्याची माहिती पोलीस स्टेशनला दिली आहे.

याप्रकरणी पोलीस निरीक्षक श्रीकांत डोंगरे यांनी सकाळी सहा वाजता घटनास्थळी जाऊन परिस्थितीचे पाहणे केली यानंतर व्यापाऱ्याचे निवेदन स्वीकारताना व्यापाऱ्याने आपल्या आपल्या भागात पहारेकरी लावावा तसेच प्रत्येक दुकानदाराने सीसीटीव्ही कॅमेरे लावावे अशी विनंती केली या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आश्वासन दिले पोलीस निरीक्षक श्रीकांत डोंगरे यांना

निवेदन सादर करताना व्यापारी महासंघाचे अध्यक्ष दगडू सोमानी, सिडस अँड फटीॆ॔लायझर असोसिएशनचे अध्यक्ष ज्ञानेश्वर उर्फ माऊली शिंदे, मोबाईल असोसिएशन संघटनेचे सचिन कवठकवार अनिल भुसारे रवी कवठकवार व अन्य व्यापारी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here