Home महाराष्ट्र आई-वडिलांच्या स्मरणार्थ शांतीधामास साउंड सिस्टीम भेट

आई-वडिलांच्या स्मरणार्थ शांतीधामास साउंड सिस्टीम भेट

95

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.11फेब्रुवारी):- तालुक्यातील मांडवा येथील ग्राम परिवर्तन समितीने दि. ७/३/२०२०पासुन विविध उपक्रमाच्या माध्यमातुन जसे संत महापुरुष यांच्या जयंती व पुण्यतिथीनिमित्त वृक्षारोपण करणे,वाढदिवसानिमित्त शांतीधामास उपयुक्त साहित्य भेट देणे तथा वृक्ष देऊन वाढदिवस साजरा करणे, आई-वडिलांच्या स्मरणार्थ शांतीधामास उपयुक्त साहित्य भेट देणे,अशाप्रकारे ग्राम परिवर्तन समितीच्या उपक्रमास लोकसहभागाच्या माध्यमातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत गेला. व गरज होती ती साऊंड सिस्टिमची ती गरज आई-वडिलांच्या स्मरणार्थ साऊंड सिस्टिम भेट देऊन केली पूर्ण.

राजेश मंदाडे रा. मांडवा ह. मु. देशमुखनगर (पुसद)यांनी वडिल स्व. लक्ष्मण मंदाडे व आई स्व राहीबाई मंदाडे यांच्या स्मरणार्थ शांतिधामास भोंगा, एंपलीफायर, माईक, आदी साहित्य ठेण्यासाठी पेटी भेट देण्यात आली.

यावेळी उपसरपंच विजय राठोड, ग्रामपंचायत अधिकारी एस. टी. तडसे, रमेश ढोले, कैलास राठोड, ग्रामपंचायत कर्मचारी प्रदुम्न आबाळे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here