


▪️ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर यांचे मनोगत !!
✒️जगदीश का.काशिकर(विशेष प्रतिनिधी)मो:-९७६८४२५७५७
उल्हासनगर, अंबरनाथ व बदलापूर तसेच कल्याण मध्ये शिवसेना संपविण्याचा वीडा काहींनी उचलला, शिवसेनेचे ठाणे व ठाण्याची शिवसेना अशी ख्याती असलेल्या ठाण्यात केवळ एकाच जागी मशाल पेटली, हे किती मोठे दुर्दैव! कल्याणमध्ये 11 नगरसेवक मशालीवर निवडून आले त्यातील चार एका झटक्यात गद्दार झाले. ज्या मतदारांनी भाजपा व शिंदेसेने विरोधात मतदान करून निवडून आणले, तुम्हाला विजयी करण्यासाठी निष्ठावंत शिवसैनिकांनी व कार्यकर्त्यांनी दिनरात मेहनत घेतली, मतदारांची मानधरणी केली त्या सर्वांशी बेईमानी करून शिंदेसेनेची विष्ठा चाटायला गेलात. लाज लज्जा सर्व कोळून प्यालयात. कश्यासाठी तर सत्तेच्या चतकोर तुकडयासाठी व काही लाखांसाठी? आत्मा मारून तुम्ही त्याची किंमत वसुल केली.
दुसरीकडे मनसेने आपले बंधुप्रेम हे बेगडी असल्याचे सिद्ध केले. ज्या शिंदे सेनेवर दिवसरात्र दुगुण्या झाडल्या, गद्दार ~गद्दार म्हणून उद्धार केला, त्या मिंधे सेनेत सामील झालात. आणि वरून विकासाचे कारण देता ? मतदार काय तुम्हाला दूधखुळे वाटले का ? लोक इंजिनला मतदान का करीत नाहीत, आणि का करू नये, हे सिद्ध करणारी घातकी कृती मनसेने केली. कदाचित माजी आमदार राजू पाटील यांना विधान परिषदेचे वेध लागले असतील, त्या बदल्यात ही सौदेबाजी केली असेल.
उल्हासनगर महापालिकेत तर भयंकर विपरीत परिस्थिती उद्भवली. ज्या नाठाळाच्या हातात AB फॉर्म देऊन निवडणुकीची जबाबदारी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोपवली तोच रातोरात भाजपासोबत शैयासोबत करून भाजपचा उमेदवार म्हणून मतदारासमोर आला, त्याला भुईसपाट करून त्याचे नाकच कापले. आत्ता नाकाची कापलेली भोकं लपवत तो फिरत आहे. यावरही शिवसेनेने मात केली. ऐनवेळी प्रभारी जिल्हा प्रमुख नेमला. चाळीस उमेदवार रिंगणात उतरवले आणि जे निष्ठावंत उरले होते, त्यांच्या बळावर निवडणूक लढवली. बाबासाहेबांच्या – “लढला नाहीस तरी विकला जाऊ नकोस,” या वचनाच्याही पुढची पायरी गाठत ते चाळीस मावळे बिकट परिस्थितीत लढले पण विकलेही गेले नाहीत. जरी ते सर्वच्या सर्व पराभूत झाले तरी त्यांनी गद्दार, थैलीशहा व सौदेबांजांशी कडवी झुंज दिली, आर्थिक पाठबळ नाही, एकाही नेत्याची सभा नाही तरी अमाप पैसा खर्च करणाऱ्या समोर दंड थोपटून उभे राहिले. कोणी- हजार, कोणी= दोन हजार तर काहींनी तीन हजार मतं घेतली. याला म्हणतात, बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक, “सर कटा सकते है लेकिन सर झुका सकते नही!” या निर्धाराने लढले. त्या उलट शिव सेनेच्या वटवृक्षाची तीस वर्षे फळं चाखणारी बांडगुलं, गिधाडं आणि वटवाघूळे भाजपाच्या फांदीवर जाऊन बसले व फांदीसह ढुंगणावर आपटले. त्यांचा मणकाच नव्हे तर माकड हाडही मोडले. पक्षाच्या नेत्यांनाही उमगले कि ज्यांना आपण वाघ समजत होतो ते लांडगे निघाले.
या पराभवाने निष्ठावंत शिवसैनिक तावून सुलाखून निघाला आहे. यापेक्षा वाईट परिस्थिती येऊच शकत नाही. मी गेली दोन वर्षे या घरभेदी बांडगुळावर लिहीत होतो, तेंव्हा मला पक्ष विरोधी ठरवले मात्र मी जे लिहीत होतो त्यामुळे, मी कसा पक्ष हितरक्षणासाठी या अनाजीला उघडे पाडून पक्ष नेतृत्वास सावध करीत होतो, तेच सिद्ध झाले आहे. अनेक स्वार्थी नेते, पदाधिकारी गद्दार झाले तरी निष्ठावंत शिवसैनिक होता तिथेच आहे. त्यामुळे उडाले ते कावळे व राहिले ते मावळे असे समजून मूळ शिवसेनेस नव्याने उभारी देण्यासाठी सज्ज होऊन आपल्या ओरिजिनल शिवसेनेचे पुन्हा सुवर्णयुग आणूया, असा निर्धार हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षां निमित्ताने निष्ठावंत शिवसैनिकांनी केला आहे.














