Home महाराष्ट्र स्व.वसंतराव नाईक यांच्या प्रथम मुख्यमंत्रीपद शपथ दिनानिमित्त ‘गौरवदिन’ साजरा

स्व.वसंतराव नाईक यांच्या प्रथम मुख्यमंत्रीपद शपथ दिनानिमित्त ‘गौरवदिन’ साजरा

107

✒️प्रतिनिधी गंगाखेड(अनिल साळवे)मो:-8698566515

गंगाखेड(दि.6नोव्हेंबर):-बंजारा बांधवांच्या वतीने गंगाखेड शहरातील स्व.वसंतराव नाईक चौक येथे (दिनांक 5 डिसेंबर शुक्रवार) रोजी गौरवदिन उत्साहात आणि अभिमानाने साजरा करण्यात आला.दिनांक ५ डिसेंबर १९६३ रोजी हरितक्रांतीचे जनक आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व.वसंतराव नाईक यांनी प्रथमच मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती.डोंगरदर्यातील, समाजातील दुर्लक्षित घटकांना नवी दिशा देणारे, शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणारे कार्य करणाऱ्या या महान नेत्याच्या स्मृतिदिनी दिनांक 5 डिसेंबर रोजी राज्यभर गौरवदिन साजरा केला जातो.

आज गंगाखेडमध्येही वसंतराव नाईक स्मारक चौकात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सामाजिक एकता, नेतृत्व मूल्ये आणि आदर्श कार्याचे स्मरण करण्यात आले. समाजासाठी प्रेरणादायी असलेल्या या क्षणी मोठ्या संख्येने समाजबांधव व मान्यवर उपस्थित होते.समारंभाची सुरुवात वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर त्यांच्या कार्याचे स्मरण, समाज प्रबोधन, युवकांना दिलेला संदेश आणि समाजातील ऐक्याबद्दल मार्गदर्शनपर भाषणे झाली.

कार्यक्रमात बंजारा समाजातील प्रतिष्ठित नेत्यांची उपस्थिती लक्षणीय होती.ज्येष्ठ नेते बाबुराव पवार,लखन (बंटी) राठोड,युवा उद्योजक व स्व.वसंतराव नाईक स्मारक समितीचे अध्यक्ष अंबादास राठोड,दत्ता चव्हाण,राजेश राठोड,जिल्हाध्यक्ष (रा.काँ.पा.) शरद पवार गट) माधवराव चव्हाण,ग्रामसेवक सोनेराव राठोड,आर.एफ.राठोड,अंकुश राठोड,रमेश पवार,राजेंद्र चव्हाण,संजय पवार,पो.पा.बोथी नारायण आडे,पो.पा. लिंबेवाडी तांडा भगवान चव्हाण,लहू आडे,पापालाल चव्हाण,कुंडलिक राठोड,माधव राठोड,अनिल राठोड,गोटू राठोड,अंबादास चव्हाण सह विविध क्षेत्रातील पदाधिकारी, कार्यकर्ते व समाजबांधव उपस्थित होते.शेवटी समाज बांधवानी विकासासाठी कटिबद्ध राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here