Home चंद्रपूर ग्रामगीता महाविद्यालयात “महापरिनिर्वाण दिन” साजरा

ग्रामगीता महाविद्यालयात “महापरिनिर्वाण दिन” साजरा

104

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.6डिसेंबर):-ग्रामगीता महाविद्यालय, चिमूर येथे 69 वा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अध्यक्षांच्या हस्ते माल्यार्पण करून करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. सुनंदा आस्वले व प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. हरेश गजभिये, राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालय, चिमूर व प्रा. डॉ. वरदा खटी उपस्थित होते. या कार्यक्रमा प्रसंगी डॉ. हरेश गजभिये यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला संघर्ष व त्या काळामध्ये त्यांचा जीवनाचा संघर्षमय प्रवास यावरती प्रकाश टाकला.

तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष, डॉ. सुनंदा आस्वले यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला दिलेली भारतीय राज्यघटना व त्यामधील सर्व बंधूंना समान न्याय, समता, बंधुता,स्वातंत्र्य याचे महत्व पटवून दिले. या कार्यक्रमाचे संचालन, सांस्कृतिक विभाग प्रमुख, प्रा. डॉ. सुमेध वावरे यांनी केले व आभार प्रदर्शन प्रा. डॉ. प्रणाली टेंभुर्णे यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here