Home महाराष्ट्र शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखावर जीवघेणा हल्ला-भाजपच्या रश्मी बागल यांनी हल्ला केल्याचाआरोप

शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखावर जीवघेणा हल्ला-भाजपच्या रश्मी बागल यांनी हल्ला केल्याचाआरोप

348

 

 

 

नागेश खुपसे-पाटील ( सोलापूर जिल्हा प्रतिनिधी), मो. 77750 96293

 

 

 

सोलापूर – शिंदे गटाचे सोलापूर जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्यावर करमाळा तालुक्यातील हिवरवाडी गावात प्राणघातक हल्ला झाला आहे. या हल्यानंतर करमाळा पोलीस निरिक्षक रणजित माने घटनास्थळी दाखल झाले होते. चिवटे यांच्यावर करमाळा शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले.
दरम्यान विविध वृतवाहिन्यांशी संवाद साधनताना चिवटे यांनी या हल्यामागे भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्ष रश्मी बागल, शिंदे सेनेचेच युवानेते दिग्विजय बागल यांचा हात असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
दिग्विजय बागल हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे विधानसभा निवडणुकीत करमाळा मतदार संघातील उमेदवार होते. जिल्हाप्रमुख महेश चिवटे यावेळेस प्रचारात आघाडीवर होते. निवडणूकीनंतर दोघांमध्ये अंतर्गत वाद सूरू झाले.
सोलापूर येथील पक्षाच्या संघटनात्मक बैठकीत चिवटे व बागल यांच्यात जोरदार खडाजंगी झाली होती तसेच पुरग्रसत भागाची पाहणी करताना दिग्विजय बागल यांनी “मला बघून घेतो” म्हणून धमकी दिल्याची तक्रार महेश चिवटे यांनी पोलीसात दिली होती.
हल्ला केल्यानंतर हल्लेखोरांने त्याच्या मोबाईल मध्ये व्हिडीओ सुरू करून तु खुप मोठा नेता लागून गेला आहे का? तु रश्मी बागल व दिग्विजय बागल यांची माफी माग, हि शेवटची वार्निंग आहे अशी धमकी दिल्याचे आरोप चिवटे यांनी केले आहेत.
या संदर्भात बागल यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तो होवू शकला नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here