


चिमूर:- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अंतर्गत असलेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द मुलींची शासकीय निवासी शाळा चिमूर ही शाळा तालुक्यामध्ये आपल्या शालेय आणि सहशालेय उपक्रमांमुळे नेहमीच आघाडीवर असते. सदर शाळा ही मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमाची तालुक्यातील प्रथम पारितोषिक विजेती तसेच पी एम श्री घोषित झालेली आहे.क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य मार्फत होत असलेल्या शालेय क्रीडा स्पर्धाचे आयोजन सुरु आहेत. त्या अनुषंगाने तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धा, कबड्डी, खो खो, बॅडमिंटन, बुद्धिबळ, आट्या पाट्या, व्हॉलीबॉल यासारख्या विविध क्रीडा प्रकारांमध्ये निवासी शाळेच्या खेळाडूंनी उत्तम कामगिरी करून जिल्हास्तरासाठी पात्र ठरल्या आहेत.
जिल्हास्तरीय खो खो अंडर १४ स्पर्धामध्ये टीमने चूरशीची लढत देत द्वितीय क्रमांक पटकवत मानाचा तुरा रोवला.
नुकत्याच पार पडलेल्या तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत
अंडर १४ (मुली) १०० m – रुतिका राणे (प्रथम), अंडर १७ (मुली) १००m – क्रिशा मेश्राम (द्वितीय),अंडर १४ (मुली) २०० m – ईश्वरी वाकडे (द्वितीय), अंडर १७ (मुली) २०० m – शृंखल भरडे (द्वितीय), अंडर १७ (मुली) थाळी फेक – गायत्री कोसे (द्वितीय), अंडर १४ (मुली) थाळी फेक – अकांक्षा नेवारे (द्वितीय), विजय मिळवला आहे.
विद्यार्थिनींचे तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे भरडे, खापर्डे, पुलेनवार, काळे, गजभिये, बोरकर, महाजन, घ्यार, नेऊलकर, धात्रक यांचे शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता खोब्रागडे यांनी कौतुक करून अभिनंदन केले आहे.













