Home चंद्रपूर अर्हेर – नवरगाव येथेल दुर्गा उत्सवाची सर्वत्र चर्चा -नऊ दिवस होणार महाप्रसादाचा...

अर्हेर – नवरगाव येथेल दुर्गा उत्सवाची सर्वत्र चर्चा -नऊ दिवस होणार महाप्रसादाचा कार्यक्रम

252

 

 

रोशन मदनकर, उपसंपादक, मो. 88886 28986

ब्रम्हपुरी:- देशात दुर्गा उत्सव मोठ्या प्रमाणात भक्ती भावाने साजरा केल्या जातो. तालुक्यातील अर्हेर – नवरगाव हा वैनगंगा नदीकाठावर वसलेला गाव आहे. या गावात एकच दुर्गा मातेचे पूजन केल्या जाते. नऊ दिवस महाआरती व महाप्रसादाचा कार्यक्रम राबविला जातो.
गावात एकच दुर्गा माता असल्याने नागरिकांचा सहभाग चांगलाच बघायला मिळतो. सकाळी आणि सायंकाळी रोज नऊ दिवस भक्तीभाने महाआरती केल्या जाते. दिवसभर आपले काम करून सायंकाळच्या महाआरतीला गावाकऱ्यांचा चांगलाच जमाव बघायला मिळतो. दुर्गा मातेच्या कृपेवार विश्वास ठेवून गावकरी सहखुशीने दुर्गा मातेच्या उत्सवात सहभागी होत असतात. सर्व कार्यक्रमाचे नियोजन दुर्गा माता मंडळ अर्हेर नवरगाव बघतो. तालुक्यातील सर्व भक्तजणांनी अर्हेर – नवरगाव येथील दुर्गा मातेचा आशीर्वाद घ्यावा असे आव्हान मंडळाकडून करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here