Home लेख देवा भाऊ, तुला आत्महत्या करावी लागेल!

देवा भाऊ, तुला आत्महत्या करावी लागेल!

270

 

 

 

 

 

 

आपण आता लोकशाही प्रणाली वापरत आहोत. सभा,निवडणुका, विधानसभा, लोकसभा, मंत्रीमंडळ, ठराव, जी आर, कायदे. जे आज जनतेच्या समस्या, संकट, विकास यासाठी बनवले जातात. यांची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारी नोकर असतात. ते सरकारी असल्याने आपण चुकून साहेब म्हणतो. पण ते नोकरच असतात. काम करून पगार घेणारे. कधी कधी लांच घेऊन काम करणारे. या सरकारी नोकरांना कामात अडथळा येऊ नये म्हणून त्यांना सरकार संरक्षण देते. इतके कि तो नोकर असूनही मालका सारखा वागतो. टेबल, खुर्ची, पंखा, कुलर, उन्हाळ्यात एसी. बाहेर नोकर, आवारात गाडी, ड्राइव्हर, पाहिजे तेंव्हा चहा पाणी,आवारात गाडी, काम करो अथवा न करो, हा थाट त्याला नोकर असला तरीही मालक बनवतो.

१७/९/२०२५ ला जळगाव ला सर्व पक्षांचा शेतकरी मोर्चा निघाला. कलेक्टर कार्यालय समोर थांबला. शेतकरी नेत्यांनी सरकार विरोधात जोरात भाषणे ठोकली. आधी सरकार मधे असलेली माणसे त्यांचे नेते होती. तरीही त्यांना कलेक्टर ने किंवा पोलिसांनी गेट बंद करून आता येऊ दिले नाही.

कलेक्टर आणि पोलिस हे जनतेच्या कामासाठी नोकर ठेवलेले आहेत. येथे सरकार नावाचे कोणीच नाही. पण सरकारचे नोकर तर आहेत. ज्यांनी सरकारी काम केले नाही. त्यांचेकडून काम करून घेण्यासाठी हा सामुदायिक मोर्चा होता. तरीही नोकरांनी गेट बंद केले. कमाल आहे! नोकर आहात तर काम केलेच पाहिजे. नाही करीत तर हाकलून, मारून, ठोकून करवून घेतले पाहिजे. पण झाले उलटेच. पोलिसांनी आतून गेट ढकलून ठेवले. शेतकऱ्यांनी बाहेरून गेट ढकलले. म्हणजे सरकारी नोकर आणि शेतकरी यांच्यात गेट आडवे आले. येथे शासन आणि प्रशासन फेल ठरलेले आहे. सरकार आणि शेतकरी यांच्यात लोखंडी दिवार आडवी आली आहे.

या शेतकऱ्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. म्हणे ही माणसे आम्हाला काम करायला सांगतात. नोकर काम करीत नाहीत तरी साव आणि ज्याच्या साठी त्यांना नोकरीवर ठेवले आहे ते गुन्हेगार. कमाल आहे?

असे का घडले? एकतर या नोकरांना कर्तव्याची जाणीव नाही. काम करीत नसतील तर यांचेवर सरकार चे नियंत्रण नाही. सरकार मधील मंत्री चोरी करीत असतील तर त्यांचे नोकर प्रामाणिक कसे असतील?
हॉटेलमध्ये सडकी, नासकी भजी मिळत असेल तर मैनेजरकडे तक्रार केली पाहिजे. ना कि वेटर कडे. येथे या प्रसंगात आमच्या जिल्ह्यातील मंत्री मैनेजर आहेत. या सरकारी दुकानदारीत तेच नफा कमावतात. तेच गल्ला घरी घेऊन जातात. तर या मंत्र्यांचा हात पकडला पाहिजे. यांचे तोंड पकडले पाहिजे. यांचे खिसे तपासले पाहिजे. यांना झटकले पाहिजे. ती वेळ येऊन ठेपलेली आहे.
महाराष्ट्र सरकार आज तरी पुर्णपणे फेल ठरलेले आहे. चोरांवर वचक ठेवणारे सरकार हेच चोरी करीत आहे. एक एक मंत्री इतका धड झाला कि, त्यालाच त्याची संपत्ती मोजता येत नाही. बायकोच्या नावावर जास्त झाली. नंतर सालीच्या नावावर ठेवली. तिचा कोटा फुल झाला. म्हणून मैत्रीणीच्या नावावर ठेवली. अशा अनेक मैत्रिणींची बॅंक फुल झाली म्हणून नोकर, ड्राइव्हरच्या नावावर ठेवली. ही संपती कोणाची?ही संपत्ती शेतकऱ्यांची. ही संपत्ती कामगारांची. ही संपत्ती तरूणांची. पण यातून कोणीही बोंब मारू नये म्हणून शेतकरी आणि कामगारांच्या बायकोला पंदराशे रूपये लांच दिली आहे. असे लांच देऊन लांच खाणारे हे मंत्री नालायक आहेत, बदमाष आहेत. हे गौडबंगाल शेतकऱ्यांना, कामगारांना, तरूणांना कळले पाहिजे. या साठी आंदोलने होत आहेत. अरे उठा! शुद्धीवर या, तुमची संपत्ती या चोरांनी चोरली. आणि तुम्ही भिकारी झाले आहात. तुमच्या बायकोला हा चोर पंधराशे देत आहे. तुमच्या बायकोला साडी , भांडी, धान्य देत आहे. आता तुमची बायको तुमचे ऐकणार नाही. कारण तिला लबाड भाऊने फुस लावलेली आहे. कुटुंब उध्वस्त झाली आहेत.
अरे लबाड भाऊ, देवाभाऊ! या शेतकऱ्यांची घरे उद्ध्वस्त करण्याचे पाप फेडावे लागेल तुला. आमचे कुटुंब बिघडवले पण तुझेही कुटुंब शाबूत राहाणार नाही. मी तर कर्जबाजारी होऊन आत्महत्या करीन .पण तुला तर कुटुंबातील कलह पाहून आत्महत्या करावी लागेल. माझा श्राप आहे. जो बहिण मेव्हण्याचा श्राप राजा दशरथाला चुकला नाही. तुला पण चुकणार नाही. जा पुन्हा एकदा रामायण वाच! मग राजकारण कर.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

शिवराम पाटील
महाराष्ट्र जागृत जनमंच
९२७०९६३१२२

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here