Home चंद्रपूर तासगांव तालुक्यातील शेत शिवारातील अतिवृष्टीमुळे पेरा झाला नसलेल्या शेतीचे त्वरीत पंचनामे करा...

तासगांव तालुक्यातील शेत शिवारातील अतिवृष्टीमुळे पेरा झाला नसलेल्या शेतीचे त्वरीत पंचनामे करा -मा शशिकांत डांगे.

227

*सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड) मोबा. 9075686100*

म्हसवड (सातारा ) :- कवठे एकंद ता- तासगाव शेत शिवारातील अतिवृष्टीमुळे खरीपाचा पेरा झाला नसल्याने त्यांच्या शेतीचा पंचनामा करावा या मागणीसाठी शेतकरी चळवळीतील आंदोलक शशिकांत डांगे ,माजी सैनिक जोतिराम जाधव व शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे बाळासो पाटणे यांनी जिल्हा कृषी अधिकारी यांना निवेदन दिले होते, त्यानुसार कार्यवाही झाली नसल्याने व सांगली भागातील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या द्राक्षबागा, पेरुबागा, भाजीपाला व इतर पिकांचे पंचनामे करुन नुकसान भरपाई द्यावी या प्रमुख मागणीसाठी माजी सैनिक जोतिराम जाधव व शशिकांत डांगे यांनी ०६ आक्टोंबर २०२५ रोजी आमरण उपोषण जाहीर केले,
त्यानुसार तालुका कृषी अधिकारी मा अनिल फौंडे साहेब
मा.उमेश मोहीते साहेब, मंडल कृषी अधिकारी. मा. अनिल लंगोटे उपकृषी अधिकारी,
व कवठे एकंदचे सहाय्यक कृषी अधिकारी मा. सचिन खरमाटे साहेब यांनी कवठे एकंद शेत शिवारातील अतिवृष्टीमुळे पेरा झाला नसलेल्या शेतीची पाहणी केली, व पाहणी अहवाल पुढे पाठवतो अशी ग्वाही दिली,
या पाहणी प्रसंगी श्री सचिन शंकर परिट,श्री प्रशांत टिंगरे, श्री गुंडा मेणगुदले, श्री बाबासो पाटणे , शेतकरी चळवळीतील आंदोलक मा.शशिकांत डांगे व अन्य शेतकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here