Home महाराष्ट्र नाशिक येथे न्यायालयाच्या नव्या वास्तूत डॉ. आंबेडकरांचा पुतळा उभारण्याची वकिलांची मागणी

नाशिक येथे न्यायालयाच्या नव्या वास्तूत डॉ. आंबेडकरांचा पुतळा उभारण्याची वकिलांची मागणी

165

नाशिक शांतारामभाऊ दुनबळे
नाशिक : नाशिक जिल्हा न्यायालयाच्या नव्या इमारतीचे उद्घाटन २७ सप्टेंबरला होणार आहे. सदर इमारतीचे उद्घाटन भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. नव्या इमारतीच्या उद्घाटनादिवशी जिल्हा न्यायालयाच्या आवारात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारावा, अशी मागणी जिल्ह्यातील वकिलांकडून करण्यात आली आहे. सुमारे सहाशे वकिलांनी या संदर्भातील मागणीपत्रावर सह्या केल्या आहेत.
या संदर्भात नाशिक जिल्हा
न्यायालयातील वकिलांनी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. डी. जगमलानी यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या मागणीचे निवेदन सादर केले आहे. संविधानाचे निर्माते आणि भारताचे पहिले कायदेमंत्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा नवी दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात उभारलेला भव्य पुतळा लक्षात घेता, नाशिक येथील नव्या इमारतीच्या दर्शनी भागात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारावा, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
नाशिक शहर आणि जिल्ह्याविषयी बाबासाहेबांना विशेष प्रेम होते. ते आपल्या व्यस्त दिनचर्येतही नाशिक ला येऊन मुक्काम करत देशपातळीवर त्यांनी घेतलेले समाजहिताचे निर्णय नाशिक येथे ठरवले गेले आहेत. त्या अर्थान डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक व राजकीय जीवनात नाशिक जिल्ह्याला विशेष महत्त्व आहे. नाशिककरांमध्ये त्यांची स्मृती टिकावी आणि वकिलांना दैनंदिन कार्यात नियमित ऊर्जा ही मिळेल हेसुद्धा या पुतळ्याच्या स्थापनेमुळे होईल. त्याचप्रमाणे, नाशिक येथील न्यायालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी काही विशेष खटलेही चालविले आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here