Home महाराष्ट्र भूमिहीन शेतकऱ्यांना रोजगार द्या, केंद्रीय मंत्री खट्टर यांना आमदार सौ. आहिरेंचे साकडे;...

भूमिहीन शेतकऱ्यांना रोजगार द्या, केंद्रीय मंत्री खट्टर यांना आमदार सौ. आहिरेंचे साकडे; मुख्यमंत्री फडणवीस यांचेही वेधले लक्ष

81

 

नाशिक शांतारामभाऊ दुनबळे
नाशिक-: नाशिकरोड देवळाली विधानसभा मतदारसंघातील शिलापूर येथे प्रादेशिक चाचणी प्रयोगशाळेची ऊर्जा विभागांतर्गत स्थापना होत आहे. या प्रकल्पाच्या स्थापनेसाठी शेतकऱ्यांच्या जमिनींचे संपादन करण्यात आले. यामुळे अनेक शेतकरी भूमिहीन झाल्याने शासनाने या शेतकऱ्यांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आमदार सरोज आहिरे यांनी केंद्रीय ऊर्जामंत्री मनोहरलाल खट्टर यांच्याकडे केली. तसेच मुख्यमंत्री वेंद्र फडणवीस यांच्याकडेही भुमिहीन तरुणांना रोजगार देण्याची मागणी केली.

शिलापूर (ता. नाशिक) येथे बुधवारी (दि. १०) केंद्रीय मंत्री खट्टर यांच्या हस्ते इलेक्ट्रिक टेस्टिंग हबचे उ‌द्घाटन झाले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष ऊपस्थिती होती.दरम्यान, देवळाली विधानसभेच्या आमदार सरोज आहिरे यांनी केंद्रीय मंत्री खट्टर यांची भेट घेतली असता त्यांनी केन्द्रीय मंञी खट्टर यांच्या निदर्शनास आणून दिले की, या प्रयोगशाळेच्या उभारणीकरिता शिलापूरमधील शेतकऱ्यांच्या जमिनीचे अधिग्रहण करण्यात आले होते. शेतकऱ्यांनी जमीन संपादनास विरोध केला असता तर प्रकल्पास अडचणी आल्या असत्या. मात्र, शेतकऱ्यांनी शासनाच्या निर्णयास सकारात्मक प्रतिसाद देत जमिनीचे संपादन करण्यास कुठलाही विरोध केला नाही. त्यामुळेच ही प्रयोगशाळा निर्माण होत आहे. पण आजवर वर्षानुवर्षे ज्या शेतीवर शेतकरी बांधव उदरनिर्वाह करत होते, ती शेती गेल्याने त्यांच्यासमोर रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. आपल्याला विनंती आहे की, शासनाने अधिग्रहण माझ्या मतदारसंघातील शिलापूर येथे प्रादेशिक चाचणी प्रयोगशाळेकरिता शेतकऱ्यांच्या जमिनीचे संपादन करण्यात आले. त्यामुळे शेतकरी भूमिहीन झाले. त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिला आहे. तरी शासनाने यात लक्ष घालून अधिग्रहण झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला प्रयोगशाळेत नोकरी देऊन त्यांचा प्रश्न सोडवावा.

भुमीहीन शेतकऱ्यांच्या कुटुंबातील सदस्याला शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरी उपलब्ध करून द्यावी, असे साकडे आ. आहिरे यानी मंत्री खट्टर यांना घातले. याप्रकरणी मुख्यमंत्री फडणवीस यांनाही निवेदन देऊन या प्रयोगशाळेकरिता मोठ्या प्रमाणात स्थानिक शेतकरी वर्गाचे भूसंपादन झालेले आहे. परिणामी, येथील शेतकरी भूमिहीन झाले आहेत. तरी या गोरगरीब शेतकऱ्यांच्या कुटुंबातील तरुणांना प्रयोगशाळेत नोकरी देण्याकरिता संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देण्याची मागणी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here