Home महाराष्ट्र पारंपारिक वाद्याने भक्तांनी दिला आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप

पारंपारिक वाद्याने भक्तांनी दिला आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप

187

 

प्रतिनिधी(अनिल साळवे, 8698566515)

“नको दणदणाट डिजे डॉल्बीचा घुमुद्या नाद टाळ मृदंगाचा” परभणी पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी दिलेल्या आदेशाने व गंगाखेड पोलीस प्रशासनाने आव्हान केल्यामुळे संपूर्ण गंगाखेड तालुक्यातील व शहरातील सर्वच गणेश भक्तांनी भक्तिमय वातावरणामध्ये वेगवेगळ्या देखाव्यासह पारंपारिक वाद्यांनी (दिनांक 6 सप्टेंबर शनीवार) रोजी अनंत चतुर्दशीदिनी गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या जयघोषाने विसर्जन मिरवणुक काढत आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला.
गणेश मंडळाच्या स्वागतासाठी दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी गंगाखेड नगर परिषदेच्या वतीने भगवती चौक येथे स्वागत कक्षाची उभारणी करण्यात आली होती गणेश भक्तांचे स्वागत करण्यासाठी स्वागत कक्षामध्ये गंगाखेड विधानसभेचे आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्यासह उपविभागीय अधिकारी तथा न.प.प्रशासक जीवराज डापकर,उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.दिलीप टिपरसे,नायब तहसीलदार अशोक केंद्रे,नायब तहसीलदार मोहम्मद अजीम,नगरपरिषदेचे मुख्याधिकारी जयवंत सोनवणे,नवले,साळवे,जगतकर,कांबळे आदीं अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.भगवती चौक मार्गाने आलेल्या एकूण २९ गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे शाल व श्रीफळ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.
शहर व तालुक्यातील गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाने ठरवून दिलेल्या “नको दनादनाट डीजे डॉल्बीचा घुमूद्या नाद टाळ मृदंगाचा” या आदेशाचे पालन करीत विसर्जन मिरवणुकीमध्ये डॉल्बी डीजे न लावत पारंपारिक पद्धतीने ढोल ताशा,भजन कीर्तन गात टाळ मृदंगाच्या गजरामध्ये मुख्य मार्गावरून मिरवणूक काढली गंगाखेड नगरपरिषदेच्या वतीने ठरवून दिलेल्या परळी रोडवरील विसर्जन स्थळांमध्येच मोठ्या गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले तर पारिवारिक गणेश मूर्तींचे गोदावरी नदीमध्ये विसर्जन करण्यात आले.डॉल्बी डीजे न लावल्यामुळे यावर्षी कसल्याही प्रकारची घटना घडली नाही अत्यंत शांततेमध्ये मिरवणूका संपन्न झाल्या.उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.दिलीप टिपरसे,पोलिस निरीक्षक श्रीकांत डोंगरे यांनी आपल्या संपूर्ण टीमसह चोख बंदोबस्त ठेवला होता.
कार्यक्रमाच्या शेवटी संपूर्ण गणेश उत्सव व मिरवणुकी दरम्यान प्रशासनाने सुंदर नियोजन केल्याबद्दल प्रशासनातील सर्वच अधिकारी व कर्मचाऱ्यांचे लॉयन्स क्लब गंगाखेडचे लॉ.दगडूशेठ सोमानी, लॉ.जगदीश तोतला,लॉ.संजय सुपेकर, लॉ.अतुल गंजेवार,लॉ.केशव देशमुख,लॉ.संजय तापडिया, प्रा.डॉ.लॉ.राजीव आहेरकर,लॉ.भगत सुरवसे, लॉ.मकरंद चिनके,लॉ.महेमूद शेख आदींच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सर्व गणेश मंडळानी उत्तमरीत्या प्रशासनास सहकार्य केल्याबद्दल पोलीस प्रशासनाच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here