


*सौ. सुवर्णा बादल बेले-(विशेष प्रतिनिधी, मो. 8208158428)*
राजुरा- शहरातील ॲड.यादवराव धोटे महाविद्यालयात श्रीगुरुदेव सेवाश्रम द्वारा आयोजित राष्ट्रसंत तुकडोजी महाराज निबंधस्पर्धेचे आयोजन करण्यात आले. हि निबंधस्पर्धा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या साहित्य व तत्वज्ञानावर आधारित असून राष्ट्रसंतांचा वैज्ञानिक दृष्टिकोन, सणोत्सव, ग्रामनाथ या तिन विषयांपैकी एक विषयावर निबंध लिहिणे गरजेचे होते, उत्कृष्ट लिखाण करणारा विद्यार्थ्यांना सन्मानित व सहभागींना सन्मानपत्र वितरित करण्यात येणार आहे, यावेळी संस्थेचे सचिव ॲड.अर्पीत धोटे यांचे सहकार्याने प्राचार्या वर्षा पोडे मॅडम चे मार्गदर्शनाखाली श्री.डि.पी.डवरे सर, आर. जे.देशकर मॅडम, जि.एम.झाडे सर यांनी सहकार्य केले, निबंधस्पर्धेला 40 विद्यार्थी बसलेले होते.
निबंधस्पर्धा आयोजनाबद्दल ॲड. राजेंद्र जेनेकर, लटारु मत्ते, बळीराम बोबडे, मनोहर बोबडे, सुभाष पावडे, गजानन बोबडे, विनायक सोयाम प्रचारक, पांडुरंग शेंडे प्रचारक, बाबुराव पहानपटे, शामसुंदर कारेकर, राजेश वाटेकर, भाऊराव बोबडे,सुरेश बोंडे, बंडू झोडे, सचिन वाटेकर, वामनराव देवतळे, संतोष खाडे, छत्रपती गेडाम, रविंद्र वांढरे, मोहन वडस्कर, मनोहर पासपुते, मारोती लोहे, रमेश धानोरकर, पुंडलिक काकडे, किशोर झाडे, रत्नाकर नक्कावार आदींनी शिक्षकवृंदांचे मनःपूर्वक आभार मानले.














