Home चंद्रपूर राजुरा येथील पंचशील मुलांच्या वसतिगृहात वृक्षारोपण संपन्न. – नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व...

राजुरा येथील पंचशील मुलांच्या वसतिगृहात वृक्षारोपण संपन्न. – नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचा वृक्षारोपण करीता पुढाकार.

156

 

राजुरा 1 सप्टेंबर
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अंतर्गत पंचशील शिक्षण संस्था द्वारा संचालित पंचशील मुलांचे वसतिगृह, चुनाभट्टी वार्ड येथे नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी पंचशील शिक्षण संस्थेचे ऍड. अरुण धोटे, उपाध्यक्ष, अमृता धोटे, सचिव, अविनाश जाधव, संचालक, सचिन येगीनवार, संचालक, बी. यु. बोर्डेवार, संचालक, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे बादल बेले, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, रजनी शर्मा, नागपूर विभाग अध्यक्षा, अनंत डोंगे, राजुरा तालुका अध्यक्ष,मिलिंद गड्डमवार, ऍड. मेघा धोटे, संतोष देरकर, सादिक हुसेन बियाबानी, आम्रपाली मनोहर अलोणे, अधिक्षिका, लोकेंद्र रंगारी, सहाय्यक मदतनीस, मारोती टेकाम, गुलाब उपरे, मिलिंद निमसरकर आदींची प्रामुख्याने उपास्थिती होती. यावेळी वृक्षारोपण व मानवता विकासाच्या कार्यात भरीव योगदानाबद्दल नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बादल बेले यांचा शॉल, श्रीफळ देऊन पंचशील शिक्षण संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमृता अरुण धोटे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here