Home विदर्भ “घरकुल” ९९% यशस्वी ; चारगावचे सरपंच लंजे सन्मानित व्हीआयपी समुह, साकोली...

“घरकुल” ९९% यशस्वी ; चारगावचे सरपंच लंजे सन्मानित व्हीआयपी समुह, साकोली मिडीया व फ्रिडमतर्फे गौरव

141

 

 

संजीव भांबोरे
भंडारा -साकोली जवळील दोनदा “स्मार्ट ग्राम” ने महाराष्ट्रात पुरस्काराने प्राप्त चारगाव सुंदरीत यावेळी ९९% टक्के आवास योजनेचा लाभ देण्यात ही गटग्रामपंचायत कौतुकास्पद ठरली आहे. करीता जनहितार्थ वारंवार आमसभा आयोजन करून विविध प्रश्न मार्गी काढणारे कर्तव्यदक्ष सरपंच मोहन लंजे यांचा ( बुध. २७ ऑगस्ट ) ला ग्रामपंचायत भवनात व्हीआयपी ग्रुप, साकोली मिडिया व फ्रिडम युथ फाऊंडेशन कडून गौरव सत्कार करण्यात आला.
चारगाव सुंदरी गटग्रामपंचायतला जिल्ह्यातील स्मार्ट ग्राम दोनदा २०२० – २१ ला “आर आर आबा पाटील” सुंदर गाव हा पुरस्कार महाराष्ट्रातून प्राप्त होत भंडारा जिल्हा परिषदेतर्फे गौरव झाला होता. आता २०२४ – २५ या काळात चारगाव सुंदरी येथील ९९% टक्के प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत कुणीही घरकुलासून वंचित नाही. येथील जनहितार्थ निर्णय घेणारे सरपंच मोहन लंजे आणि उपसरपंच लता भिवगडे, सदस्यगण मनोज जुगनाहके, रूपेंद्र मोटघरे, योगेंद्र झोडे, कविता वलथरे, मंगला सोनवाने, अर्चना मेळे व यमू झोडे यांनी वारंवार आमसभा, ग्रामसभा घेऊन प्रत्येक ग्रामस्थांच्या विविध समस्या ऐकून जलदगतीने प्रशासनाला पाठपुरावा केला होता. गावात कधी वादविवाद, तंटे उद्भवली नाहीत. कोणत्याही आमसभेला गदारोळ होत नाही व पोलीस मदतही लागत नाही. अश्या आदर्श गावाचे सरपंच मोहन लंजे यांचा सत्कार गौरव प्रसंगी व्हीआयपी ग्रुपचे अध्यक्ष अनिल कापगते, सेवानिवृत्त शिक्षक डि. जी. रंगारी, महा. शासन मान्य प्रेस संघ जिल्हाध्यक्ष आशिष चेडगे, लाखांदूर न्यायालयाचे रणविर कापगते, सामाजिक कार्यकर्ता महेश पोगळे, अंकीत कापगते यांनी ग्रामपंचायत भवन आयोजित कार्यक्रमात सत्कार गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाला तंटामुक्त समिती अध्यक्ष निलाराम बागडे, माजी अध्यक्ष भुमेश्वर लंजे, माजी उपसरपंच सुरेश लंजे, डॉ. योगेश पटले, मेथीलाल नाईक, लालदास गावराने यांसह गावातील प्रतिष्ठीत जनता हजर झाले होते. संचालन डि. जी. रंगारी तर आभार न्यायालयाचे रणविर कापगते यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here