Home चंद्रपूर अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त निबंध स्पर्धा विजेत्यांचा गौरव

अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त निबंध स्पर्धा विजेत्यांचा गौरव

144

चंद्रपूर:-लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती चे निमित्त साधून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती महोत्सवानिमित्त सामाजिक समरसता गतिविधि जिल्हा चंद्रपूर व चिल्ड्रन अकॅडमी स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित खुल्या निबंध स्पर्धेचा जिल्हास्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन चिल्ड्रन अकॅडमी स्कूल पठाणपुरा चंद्रपूर येथे करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र सरकार तर्फे डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराने सन्मानित सुनंदा पान्हेरकर यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर खुल्या निबंध स्पर्धेत दिनेश गिरी चिमूर यांना प्रथम, ज्योती कोरडे राजुरा यांना द्वितीय, सोनिया प्रसाद बल्लारपूर यांना तृतीय व रूपाली काळे चंद्रपूर यांना प्रोत्साहन पर क्रमांक मिळाला. विजेत्यांना रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशांत हजबंन प्रमुख पाहुणे, जिल्हा संघचालक तुषारजी देवपुजारी, समरसता गतिविधि संयोजक डॉ नंदकिशोर मैंद ळकर मोहन जीवतोडे, वसंत भलमे, श्रीराम पानेरकर आदी उपस्थित होते. तुषार जी देवपुजारी यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर उद्बोधन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. नंदकिशोर मैंदळकर यांनी केले, संचालन ओजस्विनी बोरीकर तर आभार प्रदर्शन दीक्षा कुंमरे यांनी मानले. सामाजिक समरसता वाढीस लागावी आणि अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनातून प्रेरणा घ्यावी असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here