Home महाराष्ट्र लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या जयंती दिनी सातारा जिल्ह्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर...

लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या जयंती दिनी सातारा जिल्ह्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर करा भीम आर्मी संघटनेची मागणी …

277

*सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड) मोबा. 9075686100*

म्हसवड (सातारा ) : साहित्य सम्राट लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांची जयंती 1आँगस्ट रोजी देश, विदेशात, मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते . मजुरांची, हमालांची, गुलामाची, शेतकऱ्यांची व्यथा आपल्या कांदबरीतून मांडणारे लोकशाही अण्णा भाऊ साठे हे समस्त कामगारांचे ,वंचितांचे, उद्धार कर्ते आहेत . संयुक्त महाराष्ट्र घडवण्यासाठी मोलाचे योगदान असुन . त्यांनी समाजात विज्ञानवाद, समता, स्वातंत्र, बंधुता , रूजविण्या साठी समते साठी आयुष्य भर लढा दिला . त्याच्या कार्याची दखल घेत रशिया या देशाने त्याचां सन्मान केला . आपल्या भारत देशाने सुध्दा त्यांचा सन्मान केला . परंतु जयंती दिनी सार्वजनिक सुट्टी नसल्या मुळे अनेक समाज बांधवांना ईच्छा असुन सुध्दा आण्णा भाऊ साठे यांना आभिवादन करता येत नाही , त्याच्या विचारांचा प्रसार करता येत नाही, त्यांच्या मुळ गावी वाटेगाव ला जाता येत नाही , तरी आपण सातारा जिल्हात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती दिनी सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी .अशी भीम आर्मी संघटने ने विभागीय दंड अधिकारी यांच्या कडे मागणी केली आहे . त्या वेळी भीम आर्मी संघटनेचे फलटण शहर, तालुका, जिल्हा पद अधिकारी उपस्थित होते.
अजित संभाजी मोरे, लक्षण काकडे, सुनिल पवार, आदेश कांबळे, राहुल गुंजाळ, यश अवगडे, कुणाल अहिवळे,विजय भोंडवे , भाई मुलाणी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here