Home चंद्रपूर जिल्हा बँकेवर पून्हा काँग्रेसचाच अध्यक्ष विराजमान होणार : जिल्हाध्यक्ष माजी आ. सुभाष...

जिल्हा बँकेवर पून्हा काँग्रेसचाच अध्यक्ष विराजमान होणार : जिल्हाध्यक्ष माजी आ. सुभाष धोटेंचा दावा.

247

 

(बादल बेले, विशेष प्रतिनिधी,
मो. 82081 58428 )

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक जवळपास १३ वर्षाच्या प्रदिर्घ कालावधीनंतर लोकशाही पद्धतीने पार पडली. या निवडणुकीत विविध पॅनल, आघाडयांच्या माध्यमातून निवडणुका लढवल्या गेल्यात. कोर्ट केसेस, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट पर्यंत वाऱ्या करण्यात आल्या, अतिशय वेगवान घडामोडींनंतर बँकेची निवडणूक यशस्वीरित्या पार पडली. सहकार क्षेत्रातील निवडणुकांमध्ये कोणताही पक्ष आपल्या पक्षाच्या चिन्हावर निवडणुका लढविल्या जात नाहीत. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सुद्धा अनेक नवी जुनी समीकरणे जुळवून संचालकांनी आपले विजय निश्चित केलेत. यामध्ये एकुण २१ संचालकांपैकी काँग्रेस तथा महाविकास आघाडी समर्थित १२ संचालक निर्विवाद निवडून आलेले असून या सर्व संचालकांना घेऊन काँग्रेसचे विधीमंडळ नेते, माजी मंत्री विजय वडेट्टीवार, खासदार प्रतिभा धानोरकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र शिंदे आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत लवकरच एक बैठक आयोजित करण्यात येणार असून यामध्ये जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा पदाधिकाऱ्यांची नावे निश्चित करण्यात येईल आणि कोणत्याही परिस्थितीत जिल्हा बँकेवर काँग्रेस आघाडीचा अध्यक्ष विराजमान होईल असा दावा चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे यांनी केला आहे.
जिल्हा बँकेवर काँग्रेस आणि महाविकास आघाडी समर्थित खासदार प्रतिभाताई धानोरकर, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष संतोषसिंह रावत, शिवसेना उभाठाचे जिल्हाध्यक्ष रविंद्र शिंदे, संदीप गड्डमवार, विजयराव बावणे, दिनेश चोखारे, जयंत टेंमुर्डे, विलास मोगरकर, रोहित बोम्मावार, डॉ. अनिल वाढई, ललित मोटघरे, उल्हास करपे असे एकूण १२ संचालक विजयी झाले असून काँग्रेस व महाविकास आघाडी समर्थित या सर्व संचालकांच्या मताधिक्याने जिल्हा बँकेवर पून्हा एकदा काँग्रेसचाच अध्यक्ष विराजमान होईल असा विश्वास माजी आमदार सुभाष धोटे यांनी व्यक्त केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here