


दौंड- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने 2024 -25 या शैक्षणिक वर्षासाठी घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये दापोडी येथील जिल्हा परिषद शाळेने उत्तम यश संपादन केले.
शिष्यवृत्ती परीक्षेची राज्य व जिल्हा गुणवत्ता यादी नुकतीच प्रकाशित करण्यात आली. यामध्ये शाळेचे दोन विद्यार्थी श्रेयश संतोष खोडवे (गुण 258) नवोदय विद्यालय निवड व कु. समर्थ साईनाथ रुपनवर (गुण 256) या दोन विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान पटकावले आहे. याशिवाय कु.आरोही खंडू खोडवे (गुण 230), कु.शौर्य किशोर चव्हाण (गुण 228) व सोहम गणपत सरके (गुण 176)या विद्यार्थ्यांनी देखील उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
या परीक्षेसाठी मार्गदर्शन करणाऱ्या वर्गशिक्षिका श्रीम. पुष्पा किशोर चव्हाण यांनी योग्य नियोजन, सातत्य,व भरपूर सराव या त्रिसूत्रीचा वापर करून हे यश संपादन केल्याचे सांगितले. तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री. राजेंद्र फणसे,शाळेतील सर्व सहकारी शिक्षक,केंद्राच्या केंद्रप्रमुख श्रीम.लता हिंगणे यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले.
नवोदय विदयार्थी निवड, मंथन परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक व शिष्यवृत्ती परीक्षेत मिळालेल्या उत्तुंग यशाबद्दल शाळेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे….दौंड तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी संजय महाजन साहेब ,शाळा व्यवस्थापन समिती तसेच समस्त ग्रामस्थ दापोडी यांनी देखील सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक केले.














