Home स्वास्थ  परभणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात प्रथम पार पडली जबडयाच्या कॅन्सरवरील जटील...

परभणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात प्रथम पार पडली जबडयाच्या कॅन्सरवरील जटील शस्त्रक्रिया

186

 

प्रतिनिधी (अनिल साळवे, 8698566515)

बदलेले राहणीमान, व्यायामाचा अभाव, व्यसनाधिनता यामुळे कॅन्सरचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढलेले आहे. अधिष्ठाता, डॉ. सदानंद भिसे यांच्या मार्गदर्शनाखाली कॅन्सर तज्ञ डॉ. मनोज मोरे परभणी मध्ये रुजु झाल्यापासुन ज्या शस्त्रक्रियाकरीता पुणे, मुंबई गाठावे लागायचे त्या आता आपल्या परभणी शहरामध्ये होवु लागल्या आहेत.

महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालयाच्या इतिहासामधील व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये तुरळक ठिकाणी होणारी शस्त्रक्रिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, परभणी येथे यशस्वीपणे पार पडली. परभणी जिल्हयातील एका 60 वर्षीय मजुरी करणारी पुरुष दररोज तंबाखुचे व्यसन करायचा. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परभणी येथे कॅन्सरच्या रुग्णांवर डॉ. मनोज मोरे उपचार केले जातात असे रुग्णांस समजले. संबंधीत रुग्णांची Biopsy घेतली असता कॅन्सर असल्याचे आढळले. शस्त्रक्रियेपुर्वी नाकातून दुर्बिनद्वारे रुग्णास भूल दिली. त्यानंतर चेहऱ्याचा डाव्या बाजुचा पूर्ण जबडा काढण्यात आला व मानेतील गाठी काढल्या त्यानंतर प्लास्टिक सर्जरी करून छातीची चमडी व स्नायू वापरून नविन जबड्याची रचना केली.परभणी जिल्हयातील एका 70 वर्षीय पुरुषाला संडासच्या जागेपासुन रक्तप्रवाह होत असे. या रुग्णांने नांदेड येथील खाजगी रुग्णालयात दुर्बिनद्वारे तुकडा घेतला असता कॅन्सर असल्याचे आढळले. रुग्णाला संडासची जागा पोटावरुन काढावी लागेल व व याकरीता अंदाजित 4 ते 5 लक्ष रुपये इतका खर्च येईल छत्रपती संभाजीनगर येथील खाजगी रुग्णालयात सांगितले होते परंतु रुग्णांच्या कुणी नातेवाईकांने शा.वै.म. परभणी येथे कॅन्सर तज्ञ डॉ.मनोज मोरे रुजु झाले आहेत असे सांगितले. त्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परभणी येथे या रुग्णावर उपचारा दरम्यान अत्याधुनिक स्टेपरल सिस्टीमचा वापर करुन संडासची जागा पोटावरुन काढायची गरज पडणार नाही. याकरीता सुमारे 70 ते 80 हजार रुपये किंमतीचे महागडे स्टेपरल सिस्टिम मा. अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे यांनी उपलब्ध करुन दिले. रुग्णांस सुटी देण्यात आली आहे. यापुढे रुग्णांस 6 सायकल केमोथेरपी घ्यावी लागणार आहे. केमोथेरपीची निशुल्क सेवा शा.वै.म. परभणी येथे उपलब्ध आहे. यानंतर रेडीएशनसाठी रुग्णांस छत्रपती संभाजीनगर येथे दाखवावे लागणार आहे.
महाराष्ट्र राज्या बाहेरील एक 48 वर्षीय महिला आदिलाबाद, तेलंगणा राज्याची रहिवाशी होती, `सदरील महिलेला 1 वर्षापासुन पोट फुगीचा त्रास होता, बरेच दवाखाने व सिटी स्कॅन केल्यानंतर त्यामध्ये अंडाशयात जवळपास 30 सेमी ची गाठ आढळली. शस्त्रक्रियेमध्ये जवळपास 10 किलो वजनाची गाठ गर्भ्रपिशवी व पोटाचा आतिल पडदा कॅन्सर शस्त्रक्रियेच्या तत्वानुसार एकसंध काढला तसेच यासोबतच 16 वर्षीय युवतीच्या गुदेच्या जागेचा सिग्नेट रिंग एडैनोकर्सिनोमा शस्त्रक्रिया व 20 वर्षीय युवतीस रॅबडोमायोसारकोमा या स्तन कॅन्‍सरवर ही शस्त्रक्रिया ही शा.वै.म. परभणी येथे पार पडली.
एक 32 वर्षीय युवक मुळचा परभणीचा पण नोकरीनिमित्त पुणे येथे रहायला होता. तिथे त्याला गुदेच्या कॅन्सरचे निदान झाले व केमोथेरपी सुरु करण्यात आली. 4 सायकल केमोथेरपी घेतल्यानंतर व सतत पुणे येथे जाणे-येणे शक्य नसल्यामुळे त्यांनी कॅन्सर तज्ञ डॉ. मनोज मोरे यांच्याशी संपर्क साधला. डॉक्टरनी त्यांना एम.आर.आय.ची तपासणी केली तपासणी अंती असे आढळले की, शस्त्रक्रिया शक्य आहे व गुदेची जागा वाचु शकते. परंतु त्याकरीता लागणारी यंत्रसामुग्री ही अत्यंत महागडी असल्यामुळे ही अडचण अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे यांच्यापुढे मांडली. त्यांनी शस्त्रक्रियेकरीता लागणारी कंटुर कर्बड कटर व सर्कुलर स्टॅपलर लागलीच उपलब्ध करुन दिली. यामध्ये रुग्णांची गुदेची जागाही वाचली. एवढया तरुण वयात व लग्नसुध्दा झालेले नसल्यामुळे एवढा गंभीर आजार व त्यामध्ये गुदेची जागा कायमची पोटावरुन काढावी लागत असल्यामुळे कुटुंब चिंतेत होते, परंतु अत्याधुनिक यंत्रासामुग्री वापरुन ही महागडी शस्त्रक्रिया निशुल्क पार पाडल्यामुळे व गुदेची जागा पोटावरुन कायमची न काढावी लागल्यामुळे कुटुंब आनंदित आहे.एक 60 वर्षीय महिला स्तन कॅन्सरने पिडीत होती, त्या महिलेचे निदान व केमोथेरपी ही छत्रपती संभाजीनगर येथील खाजगी रुग्णालयात सुरु होते, परंतु केमोथेरपी सुरु असुनसुध्दा तिची कॅन्सरची गाठ वाढतच गेली व त्यामधुन रक्त व पु येत होता. सर्व आशा संपल्यानंतर त्यांनी कॅन्सर तज्ञ . मनोज मोरे यांच्या सांगण्यावरुन पेट स्कॅनची तपासणी केल्यानंतर असे आढळले की, ती गाठ फक्त स्तनापुरतीच सिमीत आहे, परंतु गाठ काढल्यानंतर तिथे फार मोठी जखम राहणार होती, त्यामुळे डॉ. मनोज मोरे यांनी तिथे किचकट अशी प्लास्टिक सर्जरी पार पाडली, ज्यामध्ये पाठीवरची चरबी फिरवुन छातीवर टाकली व छाती तयार केली. या व अशा अनेक शस्त्रक्रिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये पार पाडल्या जात आहेत.
जिल्हातील कॕन्सर रूग्णांना उपचारासाठी पुणे, मुंबई येथे जावुन घ्यावे लागणारे महागडे उपचार व कॅन्सर शस्त्रक्रिया आता अधिष्ठाता, डॉ. सदानंद भिसे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडल्या जात आहेत.

डॉ.सदानंद भिसे.
अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, परभणी
कॅन्सर साारखा जीवघेणा आजार जर लवकर निदान व उपचार झाले तर पुर्णपणे ठीक होवु शकतो. त्यामुळे कॅन्सरचे निदान झाले तर न घाबरता त्याला सामोरे जायला हवे, योग्य उपचार व शस्त्रक्रियेने कॅन्सर पुर्णपणे बरा होवु शकतो.
डॉ. मनोज मोरे, कॅन्सर तज्ञ
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, परभणी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here