Home लेख आमदार साहेब, नको तो हरामाचा पैसा!

आमदार साहेब, नको तो हरामाचा पैसा!

260

 

 

 

मतदारांनी आमदार कडून पैसे घेऊन मतदान केले असल्याचे आता लपून राहिलेले नाही. त्या बदल्यात मत तर दिले.पण आमचे रस्ते गटारी बनवत नाहीत. आमदार निवडून आले. ते मालामाल झाले.त्यांचे कल्याण झाले. पण आमचा सत्यानाश झाला आहे. कोणाचा अपघात झाला. कोणाचा पाय मोडला. कोणाची कवटी फुटली. कोणाची बायको मेली. मताचे ५०० रुपयांतून ही भरपाई होत नाही. ५०० रूपये पुरेसे ठरत नाहीत. आमचे तर हजारो रूपये दवाखान्यात गेले. कोणाचे लाखो रूपये दवाखान्यात गेले. आमचे कुटुंबातील माणसे मेलीत. ही भरपाई कशी भरून काढणार?

जर आमदारांना तिसऱ्यांदा निवडूनही आमचे रस्ते बनवले जात नसतील तर नको तो आमदार आणि नको ते आमदारांचे पैसे. ५०० रुपये आम्हाला खूप महागात पडले. जीवघेणे ठरले. असा हरामाचा पैसा आम्हाला खूप नको आहे. म्हणून आम्ही जळगाव चे मतदार रात्री घेतलेले पैसे दिवसा परत करीत आहोत. गुपचूप घेतलेले पैसे उघड परत करणार आहोत.
पैसा घेतांना वाटले होते कि, असेही आपण कोणाही ऐरागैरा ला मत देणारच आहोत. ते वाया जाऊ शकते. त्यापेक्षा जो निवडून येण्याची शक्यता आहे त्यालाच मत दिले तर ते तरी उपयोगी ठरेल. ज्यांचे ईव्हिएम वर सेटींग आहे त्यांना दिले तर किमान वाया तर जाणार नाही. ते निवडून आले तर रस्ते बनवतील. ते गटारी बनवतील. पण आमची अपेक्षा फोल ठरलेली आहे. पश्चाताप होत आहे.
जरी आम्ही गुपचूप पैसे घेतले तरीही ते आम्हाला पचलेले नाहीत. या पापाचे शल्य मनाला बोचत आहे. माझ्या कुटुंबातील नाही पण दुसऱ्याच्या कुटुंबातील कोणी अपघातात मेले कि आम्हाला दुःख होते. मनाला खात राहाते. या मरणाला मी पण कारणीभूत आहे. या पापात मी पण सहभागी आहे. जरी प्रत्यक्ष खून केला नाही तरीपण अप्रत्यक्ष मी पण खुनी आहे. असे आता मनाला सतावू लागलेले आहे. मंदिर मधे जाऊनही मन शांत होत नाही. कथा किर्तन प्रवचन ऐकूननी पापाचा विसर पडत नाही. जळगांवच्या अशा लोकांचे पापक्षालन करण्यासाठी किरीट भाईंचे प्रवचन आणले. ऐकले पण या पापातून मुक्ती झाली नाही.

अशा विमनस्क अवस्थेत आम्हाला शिवराम पाटील मोलाचा सल्ला देत आहेत कि, तुम्ही मताचे ५०० रुपये किंवा जास्त घेतलेले असतील तर परत केले पाहिजे. आता हे कळत आहे. आता हे पटत आहे. असेच करावे लागणार आहे.
वाल्या कोळीला नारद मुनी भेटले. नारदांनी पण असेच सांगितले होते कि, जितकी माणसे मारली तितक्या वेळा राम राम म्हणा. रामाचे चरित्र लिहा. वाल्या कोळीला ते पटले. त्यांनी तसेच केले. राम राम करीत तपश्चर्या केली. रामाची माहिती गोळा करुन रामायण लिहीले. ते मारेकरी होते तर ऋषी बनले. हाच बोध आम्ही घेतला पाहिजे.
म्हणून शिवराम पाटील यांचा सल्ला आहे कि, जर आमदार जबाबदारीने काम करीत नसतील तर त्यांचेकडून घेतलेले पैसे परत केले पाहिजे. तरच या पापातून मुक्ती मिळू शकते. मनाला शांती मिळू शकते. रस्ते बनू शकतात. अपघात टळू शकतात. दु:ख कमी होऊ शकते.
म्हणून आता पटले आहे. कळले आहे. समजले आहे. नको तो हरामाचा पैसा. हरामाचा पैसा घेणे पाप आहे. असे प्रवचनकार प्रदिप मिश्रा आणि किरीट भाई यांनी सांगितले नाही. पण शिवराम पाटील सांगत आहेत. तुम्ही सांगा, आपण कोणाचे ऐकले पाहिजे?

 

शिवराम पाटील
महाराष्ट्र जागृत जनमंच
मो. ९२७०९६३१२२

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here