Home महाराष्ट्र आषाढी एकादशी निमित्त माहेश्वरी महिला मंडळाची भाव दिंडी उत्साहात संपन्न

आषाढी एकादशी निमित्त माहेश्वरी महिला मंडळाची भाव दिंडी उत्साहात संपन्न

188

अंबाजोगाई (वार्ताहर) : आषाढी एकादशी निमित्त अंबाजोगाई येथील माहेश्वरी महिला मंडळाच्या वतीने भाव दिंडीचे आयोजन दि ६ जुलै रोजी करण्यात आले होते. ही दिंडी दत्त मंदिर येथून निघून मुकुंदराज मंदिर येथे संपन्न झाली.
या दिंडीचे उद्घाटन माहेश्वरी सभेचे जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण तोष्णीवाल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा सचिव जगदीश जाजू, तालुकाध्यक्ष दत्तप्रसाद लोहिया, गोपीकिशन रादंड, गोविंद सारडा, सतीश तोष्णीवाल, संतोष भंडारी, कांतिलाल चोकडा, बीड जिल्हा माहेश्वरी महिला मंडळ अध्यक्षा सौ. पूनम जाजू, तालुका माहेश्वरी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. शिवकन्या रादंड, उपाध्यक्षा सौ. उमा बजाज, तसेच इतर महिला मंडळ पदाधिकारी उपस्थित होते.
या दिंडीत २०० महिला व ७५ पुरुष भाविक सहभागी झाले होते. सोबतच लहान मुलांनी ही सहभाग घेतला. फुगडी, पाऊली, मृदंग, टाळ यांच्या गजरात भजन व विठुनाम गात भक्तिरसात रंग भरला. दिंडी नंतर मुकुंदराज स्वामींच्या समाधीचे दर्शन घेण्यात आले. दर्शनानंतर भाविकांना खिचडी, राजगिरा लाडू व प्रसादाचे वाटप माहेश्वरी महिला मंडळाच्या वतीने करण्यात आले. माहेश्वरी महिला मंडळाने दिंडीत सहभागी सर्व भाविकांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here