Home चंद्रपूर डॉ. आंबेडकर महाविद्यालयात शाहू महाराज जयंती व व्यसनमुक्ती शपथ

डॉ. आंबेडकर महाविद्यालयात शाहू महाराज जयंती व व्यसनमुक्ती शपथ

137

 

ब्रम्हपुरी :-
स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स, ब्रम्हपुरी येथे राजश्री छञपती शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देवेश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षण संस्थेच्या सदस्या तथा महाविद्यालयातील समाजशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. स्निग्धा कांबळे यांनी छञपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
या प्रसंगी शासनाच्या निर्देशांतर्गत जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त सर्वकष नशा मुक्तीची शपथ ग्रहण करण्यात आली.
या प्रसंगी महाविद्यालयातील सर्व शिक्षक, प्राध्यापकवृंद शिक्षकेत्तर कर्मचारी तथा 35 एनसीसी कॅडेटस उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन प्रा. तुफान अवताडे यांनी केले तर अमली पदार्थ विरोधी शपथ वाचन लेफ्ट.सरोज शिंगाडे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here