Home महाराष्ट्र अवैध वाळू उपसा व वाळू वाहतूक करणाऱ्या शिरतावच्या पोलीस पाटीलला ट्रॅक्टर, ट्रॉली...

अवैध वाळू उपसा व वाळू वाहतूक करणाऱ्या शिरतावच्या पोलीस पाटीलला ट्रॅक्टर, ट्रॉली आणि वाळूसह अटक तब्बल 7 लाख 65 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त

215

*सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड) मोबा. 9075686100*

 

म्हसवड /सातारा :म्हसवड पोलीस ठाणे हद्दीतील शिरताव, तालुका माण गावचे हद्दीत लक्ष्मीआई मंदिराजवळ शिरताव ते देवापूर जाणारे रोडवर एक लाल रंगाचा ट्रॅक्टर व लाल रंगाची ट्रॉलीमध्ये वाळू भरून चोरटी वाहतूक करीत असले बाबतची खात्रीशीर बातमी काढून सदर ट्रॅक्टर व ट्रॉलीला पकडण्याकरिता जात असताना शिरताव गावाजवळ एक लाल रंगाचा ट्रॅक्टर, ट्रॉलीसह रोडवर दिसल्याने त्याचा पाठलाग करून पकडले असता त्यामध्ये वाळू भरलेली दिसून आली. त्यामुळे या अनुषंगाने म्हसवड पोलीस ठाण्यात आरोपी नामे 1) सुरेश ज्ञानदेव चंदनशिवे राहणार शिरताव यांच्यावर म्हसवड पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 201/25 कलम 303 (2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून ट्रॅक्टर, ट्रॉली, वाळू असा 7 लाख 65 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. या कारवाईमुळे अवैध वाळू उपसा करणारे व वाळू वाहतूक करणारे यांचे धाबे दणाणले आहेत.अवैध वाळू उत्खनन अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी म्हसवड पोलीस ठाण्याचा पदभार घेतल्यापासून सातत्यपूर्ण प्रभावी कारवायांचा धडाका चालू असून यापुढे देखील अवैध व्यवसाय करणाऱ्या सर्व धंद्यांवर अशाच पद्धतीने प्रभावीपणे कारवाई चालू राहणार आहे.
सदरची कामगिरी ही माननीय वरिष्ठ पोलीस अधिकारी सातारा जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली खालील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केलेली आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, अमर नारनवर, मैना हांगे, राहुल थोरात, नवनाथ शिरकुळे, अभिजीत भादुले, अनिल वाघमोडे, वसीम मुलाणी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here