


*सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड) मोबा. 9075686100*
म्हसवड /सातारा : संत ज्ञानेश्वर माऊलीची पालखीचे आळंदी येथून प्रस्थान झाले असून या पालखीसह लाखो भाविक येत्या दोन दिवसा मध्ये फलटण मध्ये येत असून फलटण मधील हाँटेल व्यावसाईक व मिठाई दुकानदार अत्यन्त निकृष्ट दर्जाचे खाद्य पदार्थाची विक्री करत आहेत या व्यावसाईकावर कारवाई करणेची मागणी भीम आर्मी संघटनेने उपविभागीय अधिकारी फलटण यांचेकडे निवेदनादवारे केली आहे
निवेदनामध्ये मागणी केली आहे की फलटण शहर आणि येणाऱ्या पालखी मार्गवर मोठ्या प्रमाणात
आथिक फायद्यासाठी अन्न उत्पादना मध्ये मोठ्या प्रमाणात निकृष्ट दर्जाचे अन्न पदार्थ बनविले जातं असून या ठिकाणी अस्वछता असते हे पदार्थ आरोग्य स हानिकारक असून असे कुजलेले, निकृष्ट दर्जाचे पदार्थ तयार करून विक्रीस ठेवले आहे अशा दुकानांवर हाँटेल वर कारवाई करून नागरिकांना आणि पालखी बरोबर येणाऱ्या भाविकाना शुद्ध ,गुणवत्ता, पारख करूण सुरक्षित अन्न मिळावे या साठी प्रयत्न करावेत. व या व्यावसाईक यांच्यावर कडक कारवाई करावी अशी भीम आर्मी संघटनेची मागणी करत आहे..
यावेळी जिल्हा उप अध्यक्ष लक्षण काकडे, तालुका अध्यक्ष अजित मोरे, तालुका उप अध्यक्ष सुनील पवार, शहर अध्यक्ष सनी पवार उपस्थित होते














