


ब्रम्हपुरी :-
अल्पावधीत नावलौकिक मिळविलेल्या जे जे मल्टिस्पेशालिटी क्लिनिक परिसरात दि.20 जूनला वृक्षारोपण करून स्त्रीरोग निदान व उपचार केंद्राचा शुभारंभ करण्यात आला.
याप्रसंगी प्रसिद्ध स्त्रीरोग व वंधत्व तज्ञ सुपरस्पेशालिस्ट डॉ. ज्ञानेश्वरी पुस्तोडे(शहारे)MBBS, MS,DNB,FMAS यांच्या स्त्रीरोग निदान व उपचार केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी मान. विश्वनाथजी शहारे नागपूर, मान. पांडुरंगजी पुस्तोडे लाखांदुर, प्रा. नामदेवराव जेंगठे, ज्योतीसावित्री पतसंस्थेचे अध्यक्ष अशोक शेंडे,यशलोक हॉस्पिटल मधील डॉ. भूषण शहारे, पॅथालाजिस्ट श्री प्रकाश कापगते, जे जे मेडिकलचे संचालक प्रतीक कोहळे उपस्थित होते. विशेष म्हणजे याप्रसंगी इमर्जन्सी केअरसाठी आलेल्या दोन रुग्णावर तातडीने उपचार करण्यात आले. सदर केंद्रामध्ये स्त्रियांच्या सर्व प्रकारच्या आजारावर माफक शुल्कामध्ये निदान व उपचार करण्यात येणार असल्याने जनतेने सदर सोयीचा लाभ घेण्यासाठी जे जे क्लिनिक मध्ये संपर्क करावा असे डॉ. ज्ञानेश्वरी पुस्तोडे यांनी आवाहन केले आहे.













